शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

परदेशातील पाहुण्यांची रत्नागिरीतील किनाऱ्यांपर्यंत भरारी

By admin | Updated: November 5, 2014 23:34 IST

अनेक पक्षी दाखल : विविधरंगी, विविध ढंगी विदेशी पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांबरोबरच अभ्यासकांचीही समुद्रकिनाऱ्यावर होतेय मोठी गर्दी

रत्नागिरी : कोकणात थंडीची सर्वात प्रथम चाहुल देणारे परदेशी पाहुणे हळूहळू कोकणातील किनाऱ्यांकडे वळू लागले आहेत. त्यामुळे पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यांना अनेक परदेशी पाहुण्यांनी पांढराशुभ्र रंग दिला आहे. जिल्ह्यातील दापोली, गुहागर, भाट्ये, वेत्ये अशा विविध ठिकाणी सध्या परदेशी पाहुणे किनारी विसावल्याचे दिसत आहे.कोकणच्या पाणथळ भागात ऐन हिवाळ्यात परदेशी पाहुण्यांचे आगमन होते. परदेशातील विविध पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापून कोकणाकडे येतात. आकर्षक रंगसंगतीचे पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. सध्या फ्लेमिंग, सीगल, परदेशी बगळे आदी पक्षी जिल्ह्यातील विविध किनाऱ्यांवर आले आहेत. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच सीगल पक्ष्यांचे थवे मोठ्या संख्येने जिल्ह्यातील विविध किनाऱ्यांवर उतरल्याचे पाहायला मिळते. हिमाचल, लडाख आदी भागातून येणारे सीगल हिवाळ्याच्या हंगामात अन्नासाठी म्हणून कोकणात येतात.परदेशी पाहुण्यांची ही गंमत पाहण्यासाठी देशी-परदेशी पर्यटकही रत्नागिरी जिल्ह्यातील किनाऱ्यांवर गर्दी करु लागले आहेत. या पर्यटकांमध्ये पक्षी अभ्यासकांचाही समावेश आहे. विविध पक्षी आता पर्यटकांनाही खुणावू लागले आहेत. किनारी गेल्यानंतर सिगलच्या थवेच्या थवे आभाळात उंचच उडताना दिसतात. पुढील पाच महिने नवीन पाहुण्यांचे किनारी वास्तव्य राहणार आहे. (प्रतिनिधी)बगळेही आता कोकणातील किनाऱ्यावर विसावले आहेत. हिवाळ्यात हे बगळे मोठ्या संख्येने किनाऱ्यावर दाखल होतात. बगळ्यांच्या अनेक जाती असून, ते नदीकिनारी वास्तव्य करतात. नदीतील छोटे मासे ते आवडीने खातात. बगळ्यांच्या विणीचा हंगामही या हिवाळी मुक्कामातच कोकणात होतो.हजारो किलोमीटर अंतर पार करुन परदेशातून आलेले सीगल पाहुणे एक-दोन नव्हे; तर चार ते पाच महिने आपला मुक्काम कोकणात करणार आहेत. काठीसारखे लालसर पाय व दणकट चोच यामुळे हे पक्षी सुंदर दिसतात. फ्लेमिंगोसारखा दलदलीच्या भागात राहणारा पक्षीही हिवाळा अनुभवण्यासाठी कोकणातील किनाऱ्यावर येतो. दलदलीतील कीटक आवडीने खाणारा फ्लेमिंगो खाडी भागात विसावतो. गुजरातच्या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने आढळणारे हे पक्षी आता तुरळक संख्येने रत्नागिरी, गणपतीपुळे आदी किनाऱ्यांवर आढळून येत आहेत.बगळेही आता कोकणातील किनाऱ्यावर विसावले आहेत. हिवाळ्यात हे बगळे मोठ्या संख्येने किनाऱ्यावर दाखल होतात. बगळ्यांच्या अनेक जाती असून, ते नदीकिनारी वास्तव्य करतात. नदीतील छोटे मासे ते आवडीने खातात. बगळ्यांच्या विणीचा हंगामही या हिवाळी मुक्कामातच कोकणात होतो.हजारो किलोमीटर अंतर पार करुन परदेशातून आलेले सीगल पाहुणे एक-दोन नव्हे; तर चार ते पाच महिने आपला मुक्काम कोकणात करणार आहेत. काठीसारखे लालसर पाय व दणकट चोच यामुळे हे पक्षी सुंदर दिसतात. फ्लेमिंगोसारखा दलदलीच्या भागात राहणारा पक्षीही हिवाळा अनुभवण्यासाठी कोकणातील किनाऱ्यावर येतो. दलदलीतील कीटक आवडीने खाणारा फ्लेमिंगो खाडी भागात विसावतो. गुजरातच्या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने आढळणारे हे पक्षी आता तुरळक संख्येने रत्नागिरी, गणपतीपुळे आदी किनाऱ्यांवर आढळून येत आहेत.