शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सैन्य भरतीमुळे खाद्यपदार्थ महाग

By admin | Updated: February 11, 2015 22:46 IST

सैन्यभरती; उमेदवारांच्या निवासव्यवस्थेची मागणी

रत्नागिरी : सैन्य भरतीसाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या उमेदवारांची गर्दी अधिक असल्याने खाद्यपदार्थांचे दर वाढले आहेत. केळी ५० रूपये डझन, तर वडापाव १२ ते १५ रूपये दराने विकण्यात येत होता.सैन्य भरतीसाठी परजिल्ह्यातून बहुसंख्येने विद्यार्थी येत आहेत. मध्यरात्रीपासून भरती प्रक्रियेसाठी विविध प्रात्यक्षिकांना प्रारंभ होत आहे. त्यामुळे परजिल्ह्यातील मंडळी एक दिवस आधीच शहरात दाखल होत आहेत. येताना एकदिवसाचा जेवणाचा डबा घेऊन मंडळी आली असली तरी खाद्य पदार्थाचा आस्वाद घ्यावा लागतो.सैन्यभरती वेळी नाश्त्याची सुविधा असली तरी बाहेर पडल्यानंतर वडापाव, सामोसा, केळी, कलिंगडाचा आस्वाद घेताना दिसून येत आहेत. हॉटेल्समध्येसुध्दा जेवणाकरिता गर्दी होत आहे. मात्र, सामान्य परिस्थिती असलेली मंडळी येताना घरचा डबा घेऊन येत आहेत. त्यामुळे जेमतेम पैशात मिळेल त्या पदार्थांचा आस्वाद घेण्यात येतो. कलिंगडाचे थंडगार काप असलेली डीश १० रूपये दराने विकण्यात येत आहे. ३० ते ४० रूपये डझन असणारी केळी ५० रूपये डझन दराने विकण्यात येत आहेत. १० रूपयांना मिळणारा वडापाव १२ ते १५ रूपये दराने विकण्यात येत आहे. समोसासुध्दा १२ ते १५ रूपयांना विकण्यात येत आहे. सायंकाळच्या वेळेत बहुतांश खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील पदार्थ संपत असल्याने विद्यार्थ्यांना फळांचा आस्वाद घ्यावा लागत आहे.१० ते १५ रूपये दराने विकण्यात येणारा मोसंबीचा रस १५ ते २० रूपये दराने विकण्यात येत होता. रत्नागिरी शहरातील बहुतांश खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकाने ९ वाजेपर्यंत बंद होत असल्याने उमेदवार आधीच खरेदी करून ठेवत आहेत. खाद्यपदार्थ खाऊन रॅपर्स, पिशव्या, कागद तसेच केळ्यांच्या साली रस्त्यावरच टाकून देण्यात येत असल्यामुळे मारूती मंदिर परिसरात सध्या गर्दीबरोबर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.पालिकेने पिण्याच्या पाण्याचा टँकर स्टेडियमवर तैनात केला असला तरी मारूती मंदिर परिसरातील नळावर, बागेतील नळावर पाण्याच्या बाटल्या भरून घेण्यासाठी गर्दी होत आहे. याशिवाय पाण्याच्या बाटल्यांनाही मागणी दिसून येत आहे. (प्रतिनिधी)सैन्यभरती; उमेदवारांच्या निवासव्यवस्थेची मागणीरत्नागिरी : रत्नागिरीत सुरु असलेल्या सैन्यभरतीसाठी विविध जिल्ह्यातील हजारो तरुण येत आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था तत्काळ करावी, अशा आशयाचे निवेदन येथील समविचारी मंचाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.पहाटे तीन वाजल्यापासून भरती सुरु होत असल्याने, या तरुणांना भरतीच्या आदल्या दिवशीच यावे लागते. कोणतीही निवास व्यवस्था नसल्याने त्यांना थंडीच्या दिवसात उघड्यावर थांबावे लागत आहे. सार्वजनिक शौचालयाचा अभाव असल्याने शहर आणि परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्याचबरोबर या उमेदवारांची आबाळही होत आहे.रत्नागिरी शहरातील महाविद्यालयानजीकच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि पालिकेच्या शाळा यामध्ये स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत. त्यामध्ये या तरुणांची व्यवस्था होऊ शकते. प्रशासनाने शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने या तरुणांच्या निवास व्यवस्थेचा प्रश्न मार्गी लावावा व या भावी सैनिकांची परवड थांबवावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन समविचारी मंचाच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या शिष्टमंडळात अशोक वाडेकर, छोटू खामकर, संजय नागवेकर, दिलीप नागवेकर, राजू चव्हाण यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)