शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

टस्कराकडून वनकर्मचाऱ्यांचा पाठलाग

By admin | Updated: May 11, 2016 23:54 IST

वीस मिनिटे थरार : दोडामार्ग तालुक्यातील बाबरवाडी येथील प्रकार; शेतकरीही टार्गेट

दोडामार्ग : तालुक्यातील बाबरवाडी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये जंगली टस्करामुळे दहशतीचे वातावरण असताना याच टस्कराने बाबरवाडीत गस्तीवर असलेल्या वन कर्मचारी तसेच शेतकऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वन कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बचावले. पाठीमागे लागलेला टस्कर आणि जिवाच्या आकांताने सैरावैरा पळणारा माणसातील हा थरारक संघर्ष अंगावर काटा उभा करणारा ठरला. जवळपास २० मिनिटे सुरू असणाऱ्या या संघर्षाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली.याबाबतची अधिक माहिती अशी की, नेहमीप्रमाणे मंगळवारी सायंकाळी वनपाल दत्ताराम देसाई, वनसंरक्षक विश्राम कुबल गस्त घालत होते. बाबरवाडीतील विष्णू सीताराम सडेकर यांच्या शेतमांगरात ते थांबलेहोते. त्यांच्यासोबत सडेकर, रामराव लोंढे, आदी शेतकरी उपस्थित होते. अचानक टस्कराचे त्या ठिकाणी आगमन झाले. समोर माणसांना बघून बिथरलेल्या टस्कराने त्यांच्यावर हल्ला करण्याच्या दृष्टीने चाल केली. टस्कर आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून शेतकऱ्यांनी जीव मुठीत धरून पळण्यास सुरुवात केली. टस्कर त्यांच्या पाठीमागून धावत होता. वनरक्षक कुबल यांनी प्रसंगावधान राखत टस्कराच्या दिशेने अ‍ॅटमबॉम्ब पेटवून फेकला. त्यामुळे टस्कराने वनकर्मचाऱ्यांचाही ]+पाठलाग सुरू केला. जवळपास वीस मिनिटे हा थरार सुरू हाता. टस्कराला जंगलाच्या दिशेने पिटाळून लावल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. गेल्या काही दिवसांपासून बाबरवाडी व बोरयेवाडी परिसरात जंगली हत्तींचा कळप फिरत आहे. या कळपाने वायंगणी भातशेती, फणस, केळी व माडबागायतींचे अतोनात नुकसान केले आहे. एवढेच नव्हे, तर लोकवस्तीपर्यंत हा कळप येऊन पोहोचला आहे. यातील टस्कर आक्रमक झाला असून, सायंकाळी तो लोकवस्तीत येतो. बाबरवाडीच्या मुख्य रस्त्यावरून त्यांची ये-जा असते. या हत्तीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्तींचा उपद्रव शेतकऱ्यांना होऊ नये, यासाठी वनकर्मचारीही गस्त घालतात. (प्रतिनिधी)