शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

लाटांचा आस्वाद युवतीच्या अंगाशी

By admin | Updated: June 13, 2016 00:14 IST

नातेवाइकांनी वाचविले : मालवण रॉक गार्डन येथील थरार

मालवण : शहरातील रॉक गार्डन येथील खडकांवर आदळणाऱ्या अजस्र लाटांचा अनोखा नजराणा पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. समुद्रात मान्सूनच्या पार्श्वभूमीवर उधाणसदृश स्थिती निर्माण झाल्याने उसळत्या लाटांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत. मालवण रॉक गार्डनजवळ खडकाळ भागात उंच उसळणाऱ्या लाटांचा आस्वाद घेत असताना एक पर्यटक युवतीला मोठ्या लाटांचा तडाखा बसला. या लाटाचा आस्वाद घेणे या युवतीच्या चांगलेच अंगलट आले आहे. लाटेच्या वेगात ती खडकावर आदळली. खडकावरून समुद्रात कोसळण्याच्या स्थितीत असताना तिचे नातेवाईक व पर्यटकांनी त्या युवतीला वाचविल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. येत्या २४ तासांत कोकण किनारपट्टी भागात मान्सून सक्रिय होणार असल्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. समुद्रकाठी फेसाळणाऱ्या लाटांचा अनोखा नजराणा पाहण्यासाठी पर्यटक किनाऱ्यांवर गर्दी करीत आहेत. मालवण शहरात सर्वाधिक गर्दी रॉक गार्डन येथे असल्याचे दिसून आले आहे. मालवणात पावसाचा जोर कायम असून ६० मि.मी. पावसासह १ जूनपासून मालवणात ४५१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. बहरात आले आहे. मालवणात पावसाचा जोर कायम असून ६० मि.मी. पावसासह १ जूनपासून मालवणात ४५१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) अतिउत्साही पर्यटकांना रोखणार कोण ?पर्यटन हंगाम संपला असला तरी पावसाळी पर्यटन जिल्ह्यात उदयास येत आहे. पर्यटकांची संख्याही १ जूनपासून लक्षणीय आहे. पावसाळ्यात समुद्रात उधाणसदृश लाटा असल्याने १ जून ते ३१ जुलै या कालवधीत मासेमारी बंदी कालावधी असतो. तसेच किनाऱ्यालगत पर्यटकांनी पाण्याशी खेळू नये. जेणेकरून आपल्या जिवाचे बरेवाईट होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळी हंगामात किनारपट्टी भागात समुद्रात जाण्यास मनाई असते. यावर कानाडोळा न करता शासनाचा नियम पाळणे आवश्यक आहे. पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेताना इतर नागरिक व स्थानिक लोकांना त्रास होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. पावसाळ्यात समुद्रस्नानाचा आनंद घेऊ नये. खोल समुद्रात जाणे टाळणे आवश्यक आहे. मात्र पालिकेच्या वतीने रॉक गार्डन येथे सूचना फलक लावण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.