शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

खारेपाटणात पूरस्थिती; रस्ता पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 00:50 IST

दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपले : गावाचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

खारेपाटण : गेले बरेच दिवस संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे खारेपाटणमध्ये पुन्हा एकदा पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून खारेपाटण गावात येणारा महामार्ग ते बसस्थानक हा प्रमुख रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे गावाचा संपर्क तुटला. तर खारेपाटण शहरात पुराचे पाणी संध्याकाळच्या व विशेष करून रात्रीच्या वेळेत घुसल्यामुळे व्यापारी नागरिकांमध्ये प्रचंड घबराट झाली. याबाबत अधिक वृत्त असे की, सोमवारी दुपारी १ वाजल्यानंतर खारेपाटण बाजारपेठ बंद होती. अचानक पावसाने सोमवारी सायंकाळी जोरदार सुरवात केल्याने खारेपाटण बाजारपेठेत पाणी घुसले. त्यामुळे खबरदारी म्हणून व्यापारीवर्गाने आपले सामान इतरत्र हलविण्यास सुरवात केली होती.तर तळगांवकर यांचे घर पाण्यात चारी बाजूने घेरले होते. तसेच खारेपाटण परिसरातील जैनवाडी, कालभैरवाडी, कपिलेश्वरवाडी, गुरववाडी, बाजारपेठ, चर्मकारवाडी, काझीवाडी, बंदरवाडी, भैरीआळी, पंचशीलनगर, हनुमाननगर आदी परिसरातील नागरिकांना पुराच्या पाण्याचा सामना करावा लागला. खारेपाटणमध्ये पूर आल्याच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण उपसरपंच संदेश धुमाळे, ग्रामसेवक गिरीश धुमाळे, पोलिस पाटील बाळा शेट्ये, तलाठी रमाकांत डगरे यांनी पुराची पाहणी केली. मात्र वरीष्ठ पातळीवरील कोणीही अधिकारी आतापर्यंत पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले नाहीत. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पूर आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली मात्र स्वसंरक्षणाची साधने, व साहित्य नागरीकांना किंवा ग्रामपंचायत कार्यालयांना पुरविण्यात आलेली नाहीत. याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रात्री उशिरा खारेपाटणमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले. या पावसामुळे शेती जलमय झाली आहे तर परिसरातील काही भागातील रस्त्यावर पाणी आले आहे. (वार्ताहर)मच्छिमार्केट बाजारपेठेत पाणी घुसलेघोडेबाजार बंदर रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे बंदरवाडी (मुस्लिम वस्तीचा) संपर्क तुटला तर जैनवाडी यादेखील वस्तीच्या बाजूने पाणी घुसल्याने नागरिकांनी जैनमंदिरांचा आसरा घेतला. खारेपाटण हायस्कूल ते खारेपाटण बसस्थानक रस्ता पूर्णत: पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला. खारेपाटणमधून वाहणाऱ्या शुकनदीने आपले पात्र बदलल्याने पुराचे पाणी पूर्णत: खारेपाटण शहरात घुसले. यामुळे खारेपाटण मच्छिमार्केट पाण्याखाली गेले. तसेच बाजारपेठेतील काही दुकानांमध्ये पाणी घुसले.