शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

लोटेत वायुगळती; गुदमरून चौघांची प्रकृती गंभीर

By admin | Updated: January 12, 2017 23:41 IST

लोटेत वायुगळती; गुदमरून चौघांची प्रकृती गंभीर

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील योजना केमिकलमध्ये गुरुवारी झालेल्या वायुगळतीमुळे कंपनीत काम करणाऱ्या कामगारांसह परिसरातील अनेक ग्रामस्थ गुदमरले. दोन कामगारांसह दोन ग्रामस्थांना गंभीर बाधा झाली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली.कंपनीत रंग बनविण्याचे काम सुरू असताना रिअ‍ॅक्टरचा पाईप तुटल्याने कंपनीच्या रिअ‍ॅक्टरमधील ‘ओलियम’ या अ‍ॅसिटीक अ‍ॅसिडची गळती झाली आणि परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. लगतच असणारी लोटे वसाहतीतील चाळकेवाडी, गुणदेची तलारीवाडी, आवाशीची भेडेवाडी, ताम्हणवाडी येथील ग्रामस्थांना गुदमरल्यासारखे झाल्याने श्वास घेणे अवघड होत होते.यावेळी एस. के. आंब्रे, अंकुश काते, अरुण चव्हाण, चंद्रकांत चाळके, चेतन वारणकर, धनंजय रेडीज, शशांक रेडीज, प्रियकांत रेडीज, नाना चाळके, असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीराम खरे, पुटकरचे राजेश तिवारी, नंदादीपचे मिलिंद बापट, एक्सलचे एस. वाय. पाटणकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अभिजित कसबे, लोटे पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक बी. एच. काकडे, विवेक साळी उपस्थित होते. लोटे अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी गळती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. यामध्ये विनोद गणपत मोरे (वय २७, कापरे, चिपळूण) व किशोर केशव रेवाळे (३६, रा. चिपळूण) हे कामगार भाजले असून, सुनंदा यशवंत चाळके (७०, चाळकेवाडी), तसेच लोटेचे उपसरपंच रवींद्र गोवळकर यांना वायुबाधा झाली. त्यांना परशुराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गोवळकर यांना अधिक त्रास होत असल्यामुळे सायंकाळी उशिरा त्यांना खेडच्या हृदयविकार तज्ज्ञांकडे हलविण्यात आले आहे. दोन्ही कामगारांना अधिक उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले आहे. एक्सल इंडस्ट्रिज लिमिटेड या कंपनीची संपूर्ण सुरक्षा समिती ही वायुगळती आटोक्यात आणण्यात गुंतली होती. इतकेच नव्हे, तर यासाठी लागणारी यंत्रसामग्रीही कंपनीतूनच आणली जात होती. एक्सलसह ए. बी. मौरी व घरडाचे सुरक्षा अधिकारी व कर्मचारी मदतीला धावले होते. तब्बल दोन तास उलटले तरी कंपनी मालक व पोलिस वगळता प्रशासनाचे कोणतेही जबाबदार अधिकारी घटनास्थळी येत नसल्याने जमावाचा उद्रेक झाला होता. यावेळी आलेल्या सीईटीपी व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत ‘तू-तू मै-मै’ झाली. बेजबाबदारपणे सुरक्षा साधनांचा वापर न करणाऱ्या कंपन्या तत्काळ बंद करा, अशी मागणी जमावातून होत होती.पर्यावरणमंत्र्यांच्या तालुक्यात औद्योगिक सुरक्षेचे वाभाडे निघत आहेत. केवळ नोटीस देऊनही समस्या सुटणार आहे का? आमच्या सुरक्षेची हमी काय? असे प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.या दुर्घटनेनंतर खेडचे तहसीलदार अमोल कदम, पोलिस उपविभागीय अधिकारी विकास गावडे, पोलिस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघाताचा पंचनामा सुरू असून, जखमींचे जबाब झाल्यानंतर अपघात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती बी. एच. काकडे यांनी दिली. (वार्ताहर)दोन महिन्यांतील चौथी घटनाही संपूर्ण रासायनिक वसाहत सुरक्षेच्या दृष्टीने चर्चेत आली असून, गेल्या दोन महिन्यांत नंदादीप केमिकल कंपनीत टाकीचा स्फोट होऊन एक कामगार मृत झाला, तर सुप्रिया केमिकलमधील अपघातात दोन कामगारांनी जीव गमावला. याआधी गरुडा केमिकल कंपनीत लागलेल्या वायूने एकाचा बळी गेला होता. त्यानंतरची आजची ही चौथी घटना आहे. त्यामुळे इथली सुरक्षा ‘राम भरोसे’ असल्याचे चित्र आहे.सुरक्षा यंत्रणाच नाहीकंपनीत कसलीच सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नसून, या वायुगळतीला नियंत्रणात आणण्यासाठी ज्या ज्या गोष्टी व उपाययोजना आवश्यक होत्या, त्यांचा प्रामुख्याने अभाव दिसून आला. साधे नाकाला लावण्यात येणारे मास्कही उपलब्ध नसल्याने कामगारही गुदमरले जात असल्याचे उपस्थितांनी निदर्शनास आणले. कंपनीचा आवारही मोकळा नसल्याने अग्निशमन दलालाही अडचणीचा सामना करावा लागत होता.