शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जुगार खेळताना पाच जणांना रंगेहात पकडले

By admin | Updated: July 8, 2014 23:17 IST

वैभववाडी बसस्थानकासमोर कारवाई

वैभववाडी : येथील बसस्थानकासमोरच्या इमारतीमध्ये राजरोस चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी ५ जणांना रंगेहात पकडले. ही कारवाई सकाळी ११.३० वाजता केली. कणकवली न्यायालयाने प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची कारवाई करून त्यांना सोडले.वैभववाडी बसस्थानकासमोरच्या इमारतीमध्ये राजरोस जुगार अड्डा चालवला जातो. याबाबत माहिती मिळाल्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लाड यांच्यासमवेत पोलिसांच्या पथकाने सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास धाड टाकली. त्यावेळी पाचजण जुगार खेळताना रंगेहात पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.मोहन दत्ताराम साळुंखे (वय ४७, रा. खांबाळे), नंदकिशोर सखाराम मुद्रस (वय ४०, रा. उंबर्डे), तुकाराम लक्ष्मण गुरव (वय ६७, रा. कोकिसरे), श्रीपत सखाराम कांबळे (वय ४७, रा. कुसूर), रशिद रहेमान शेख (वय ३२, रा. वाभवे) यांच्याविरूद्ध मुंबई पोलीस अ‍ॅक्टनुसार कारवाई करून कणकवली न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांच्यावर २ हजारांची दंडात्मक कारवाई करून सोडले.बऱ्याच कालावधीनंतर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून पाचजणांना पकडले. मात्र, ही कारवाई रस्त्याच्या शेजारी सार्वजनिक ठिकाणी केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या कारवाईबद्दल वैभववाडी शहरात दिवसभर उलटसुलट चर्चा सुरु होती.वैभववाडी तालुक्यात ठिकठिकाणी राजरोस जुगार अड्डे सुरू आहेत. मात्र, पोलीस यंत्रणा या अड्ड्यांवर कारवाई का करत नाही. असा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पोलिसांनी अशाप्रकारे थेट कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणीदेखील ग्रामस्थांमधून होत आहे. (प्रतिनिधी)