शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष पदासाठी पाच नामनिर्देशनपत्र दाखल

By admin | Updated: November 20, 2015 00:09 IST

वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणूक : माघारीनंतर २३ ला होणार चित्र स्पष्ट

वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष पदासाठी पाच नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. काँग्रेस पुरस्कृत वाभवे-वैभववाडी विकास आघाडीतर्फे रवींद्र रावराणे यांनी दोन व दीपा दीपक गजोबार तर भाजपा शिवसेना युती पुरस्कृत वैभववाडी नगरविकास आघाडीतर्फे सुचित्रा रत्नाकर कदम व रोहन जयेंद्र रावराणे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली असून ती सर्व वैध ठरली आहेत. सोमवार २३ रोजी नामनिर्देशनपत्र माघारीनंतर नगराध्यक्ष निवडीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, नगरपंचायतीची घोषणा झाल्यापासून काँग्रेसने नगराध्यक्ष म्हणून प्रोजेक्ट केलेल्या संजय चव्हाण यांनी मात्र नामनिर्देशनपत्र दाखल केलेले नाही.काँग्रेस पुरस्कृत वाभवे-वैभववाडी विकास आघाडीकडे नऊ नगरसेवकांसह बहुमत आहे. तर भाजपा शिवसेना पुरस्कृत वैभववाडी नगरविकास आघाडीकडे आठ नगरसेवक आहेत. सकाळी पावणे बाराच्या सुमारास भाजपा शिवसेना पुरस्कृत वैभववाडी नगरविकास आघाडीच्या सुचित्रा रत्नाकर कदम व रोहन जयेंद्र रावराणे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जी. आर. गावीत यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल केली. यावेळी शिवसेना नेते जयेंद्र रावराणे, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, सज्जनराव रावराणे, अशोक रावराणे, नंदू शिंदे, मंगेश लोके, नगरसेवक संतोष माईणकर, संतोष पवार, रवींद्र तांबे, सुप्रिया तांबे, तसेच रत्नाकर कदम, रणजित तावडे, सुनील रावराणे विवेक रावराणे, संतोष बोडके, बाबू माईणकर आदी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी सव्वा एकच्या सुमारास काँग्रेस पुरस्कृत वाभवे-वैभववाडी विकास आघाडीतर्फे रवींद्र रावराणे (दोन) व दीपा दीपक गजोबार यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत नामनिर्देशनपत्र दाखल केली. यावेळी तालुकाध्यक्ष भालचंद्र्र साठे, दिलीप रावराणे, जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर पाटील, पंचायत समिती सदस्य नासीर काझी, शुभांगी पवार, नगरसेवक संजय चव्हाण, समिता कुडाळकर, संपदा राणे, अक्षता जैतापकर तसेच माजी सभापती अरविंद रावराणे, माजी कृषी सभापती संदेश सावंत, तुळशीदास रावराणे, सुरेश सावंत आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भिसे यांनी दुपारी दोन वाजता दाखल नामनिर्देशनपत्रांची उमेदवारांच्या उपस्थितीत छाननी केली. दाखल पाचही नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्यात आली. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची सोमवार २३ पर्यंत मुदत आहे. त्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)