शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांत सत्तावीस लाखांची अवैध दारू जप्त

By admin | Updated: September 18, 2016 00:02 IST

उत्पादन शुल्क विभागाची माहिती : ३३९ गुन्हे, ६८ आरोपींना अटक

कणकवली : राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग विभागातर्फे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांत २७,५६,०३५ रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी एकूण ३३९ गुन्हे नोंदविण्यात आले असून ६८ आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सिंधुदुर्ग अधीक्षक संतोष झगडे यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली.सिंधुदुर्ग हा जिल्हा गोव्याच्या सीमेवर लागून असल्याने गोव्यात कथितरीत्या उत्पादन केल्या जाणाऱ्या दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. गोव्यातून सिंधुदुर्गमार्गे चोरट्या मार्गाने अशी दारू आणली जाते. त्यासाठी सिंधुदुर्ग हा प्रवेशद्वार ठरतो. त्यामुळेच उत्पादन शुल्क खात्याने अवैध दारूच्याविरोधात या जिल्ह्यात आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यातूनच गेल्या पाच महिन्यांत जवळपास साडेसत्तावीस लाखांची अवैध दारू जप्त करण्यात आली.राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत अवैध दारूच्या विरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसारच एप्रिल २०१६ ते आॅगस्ट २०१६ दरम्यान ही कारवाई करण्यात आली.अवैध मद्य विक्रीविरुद्ध कारवाई अधिक प्रभावी होण्याच्या दृष्टीने नागरिकांनी अवैध दारूबाबत तक्रार नोंदवावी याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाने नवीन व्हॉट्सअ‍ॅप नंबर सुरू केला आहे.संपूर्ण राज्याकरिता हा एकच व्हॉट्सअ‍ॅप नंबर सुरू राहणार आहे. या क्रमांकावर केलेली अवैध मद्य विरोधातील तक्रार आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र-मुंबई यांच्याकडे नोंद होणार असून, त्याची वरिष्ठ पातळीवर तत्काळ दखल घेतली जाणार आहे. (वार्ताहर)तक्रारीसाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकनागरिकांनी अवैध दारूच्या विरोधात तक्रार असल्यास त्यांनी ८४२२००११३३ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर संदेशाद्वारे, लेखी स्वरूपात, फोटो किंवा चित्रफितीच्या स्वरूपात पाठवावी, असे आवाहन सिंधुदुर्ग राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे यांनी केले आहे.