शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

पाच कोटी दहा लाखांचा निधी अखर्चित

By admin | Updated: May 11, 2016 00:09 IST

बांधकाम समिती सभेत उघड

सिंधुदुर्गनगरी : सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाअखेर जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नातील २२ कोटी ९९ लाख ५० हजारांपैकी १७ कोटी ८९ लाख ४५ हजार ९८६ लाख निधी विविध विभागांनी आपापल्या योजनांवर खर्च केला आहे, तर तब्बल पाच कोटी दहा लाख चार हजार १४ रुपये एवढा निधी अखर्चित राहिला असल्याची धक्कादायक बाब मंगळवारी वित्त समिती सभेत उघड झाली. अध्यक्ष, समाजकल्याण, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, आदी विभाग निधी १०० टक्के खर्च करण्यास कमी पडले, असे सांगून सभापती दिलीप रावराणे यांनी नाराजी व्यक्त करीत संबंधित खातेप्रमुखांना खडे बोल सुनावले. गेल्या तीन वर्षांत सरासरीपेक्षा निधी खर्चात मागे असणाऱ्या विभागांना आगामी अंतिम सुधारित अर्थसंकल्पात निधीच वाढवून न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सभापतींसमवेत सर्व सदस्यांनी घेतला.जिल्हा परिषद वित्त व बांधकाम समितीची मासिक सभा या विभागाचे सभापती दिलीप रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी समिती सदस्य सुरेश ढवळ, सुभाष नार्वेकर, समिती सचिव (पान १ वरून) तसेच लेखा व वित्त अधिकारी मारुती कांबळी, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्हा परिषदेचे दोन दिवसांपूर्वीच मार्च एंडिंग क्लोज केल्याची घोषणा वित्त अधिकारी मारुती कांबळी यांनी केली व निधी खर्च व अखर्च राहिलेल्यांची आकडेवारी सभागृहात सादर केली. मारुती कांबळी म्हणाले, २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा परिषद स्व उत्पन्नातून विविध विभागांना २२ कोटी ९९ लाख ५० हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यापैकी या आर्थिक वर्षात १७ कोटी ८९ लाख ४५ हजार ९८६ रुपये खर्च झाले. त्यामुळे पाच कोटी दहा लाख रुपये अखर्चित राहिल्याचे सभागृहात सांगितले. अखर्चित राहिलेल्यांमध्ये जिल्हा परिषद बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण, समाजकल्याण, आरोग्य, महिला व बालकल्याण, आदी विभागांचा समावेश असून, या सर्व विभागांना निधी अखर्चित राहिल्याची कारणे विचारली. सुरुवातीला समाजकल्याण विभागाचा ४२ लाख ४८ हजार ९६० रुपये शिल्लक राहिलेल्याचा खुलासा करण्यात आला. अपंगांवर खर्च करण्यात येणारा ३ टक्के निधी उशिराने प्राप्त झाल्याने हा निधी अखर्चित राहिल्याचे सांगितले. बांधकाम विभागाचा प्राप्त तीन कोटी १७ लाखांपैकी एक लाख २७ हजार अखर्चित राहिल्याबाबत सभापती दिलीप रावराणे यांनी नाराजी व्यक्त केली. मी जरी या विभागाचा सभापती असलो तरी सर्वांना समान न्याय या भावनेतून मी काम करणारा आहे, असे सांगत सर्वच विभागप्रमुखांना सभापती रावराणे यांनी फटकारले. (प्रतिनिधी) यापुढे निधीला कात्रीगेल्या तीन वर्षांत सरासरीपेक्षा कमी निधी खर्च करणाऱ्या विभागांना पुढील अंतिम सुधारित अर्थसंकल्पात निधीला कात्री लागणार असल्याचे सूतोवाच सभापती दिलीप रावराणे यांनी करत तसा निर्णयही घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वित्त व लेखा अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली.सदस्याने १३ वेळा बदलले कामसदस्यांना स्वनिधीचे वाटप वेळेत केले जाते. त्या अनुषंगाने काही सदस्यांकडून कामे सुचविताना दिरंगाई होते. एका सदस्याने तर एक काम चक्क १३ वेळा बदलले. काम करण्याचे त्राण राहत नाही, असे वित्त अधिकाऱ्यांनी सभागृहात स्पष्ट केले. यावर सदस्य सुरेश ढवळ यांनी अशा पद्धतीने वागणाऱ्या सदस्यांना कामे एकदाच सादर करण्याच्या सूचना द्याव्यात, असे सुचविले. मात्र, वित्त अधिकाऱ्यांनी लागलीच ‘आपण सभागृहात बोलताय म्हणून बोलताय’ असे ढवळ यांना हात जोडून सांगताच सभागृहात हशा पिकला.