शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मच्छिमारांना मिळणार आठ कोटींचा परतावा

By admin | Updated: November 10, 2015 23:52 IST

दिवाळीनंतर वितरण : अद्याप १२ कोटी रुपये बाकी

रत्नागिरी : जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांना दिवाळी भेट मिळाली असून, तब्बल सात महिन्यांनी आठ कोटींचा डिझेल परतावा जाहीर झाला आहे. २0 कोटी परताव्यापैकी आठ कोटी रुपये मंजूर झाले असून, दिवाळीनंतर त्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती सहायक मत्स्य आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी दिली.मच्छिमारांचा २० कोटींचा परतावा देणे शिल्लक आहे. आमदार उदय सामंत यांच्याकडे मच्छिमारांनी कैफियत मांडली होती. आमदार सामंत यांनी विधानसभेत प्रश्न मांडून त्याचा पाठपुरावा केला होता. त्यामुळे प्रलंबित २० कोटींपैकी आठ कोटींचा परतावा सोमवारी जमा झाला आहे. डिसेंबर २०१४पर्यंत ७.५ कोटी, त्यानंतर दोन कोटी व मार्च २०१५ मध्ये दोन कोटी मिळून एकूण ११.५ कोटी रुपयांचा परतावा मच्छिमारांना मिळाला होता. त्यानंतर आता आठ कोटींचा परतावा प्राप्त झाला आहे. आतापर्यंत १९.५ कोटी रुपयांचा डिझेल परतावा प्राप्त झाला आहे. अजूनही २० कोटी डिझेल परताव्याची आवश्यकता आहे. शासनाने मार्चनंतर तब्बल सात महिन्यांच्या विलंबाने डिझेल परतावा दिला आहे. मच्छिमारांना खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जावे लागते. त्यामुळे खलाशांचा पगार, डिझेल, बर्फ तसेच अन्य देखभाल खर्च लक्षात घेता त्या तुलनेत मासे न सापडल्यास मच्छिमारांचे नुकसान होते. त्यामुळे वेळेवर डिझेल परतावा देण्यात यावा, अशी मागणी मच्छिमारांकडून होत आहे. (प्रतिनिधी)