शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतर प्रथमच प्रशासन पोहोचणार करुळ केगदवाडीवर

By admin | Updated: December 10, 2015 22:16 IST

तहसीलदार घेणार आढावा : खातेप्रमुखांच्या उपस्थितीत १७ ला बैठक--लोकमत इफेक्ट

वैभववाडी : वनखात्याच्या जमिनीमुळे सव्वाशे वर्षांपासून जीवनावश्यक सुविधांसाठी झगडणाऱ्या करुळ केगदवाडीचे भयाण वास्तव ‘लोकमत’ ने जगासमोर मांडल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर ६८ वर्षांनी तालुका प्रशासन प्रथमच येत्या गुरुवारी केगदवाडीवर पोहोचणार आहे. वैभववाडी तहसीलदारांनी १७ रोजी सकाळी ११ वाजता वन व महावितरणसह सर्व खातेप्रमुखाची बैठक करुळ केगदवाडी येथे आयोजित केली आहे. त्यामुळे पाच पिढ्यांपासून वीज, रस्ता व पाणी या मुलभूत सुविधेच्या प्रतिक्षेत संघर्ष करणाऱ्या केगदवाडीतील धनगर समाजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. अकरा कुटुंबांच्या सुमारे ७0-७५ लोकसंख्येची करुळ केगदवाडी नामक वस्ती चहूबाजूंनी वनखात्याच्या जंगलाने वेढलेली आहे. त्यामुळे या वस्तीवर अद्याप वीज, रस्ता व पिण्याच्या पाण्याची कोणतीही सरकारी योजना पोहोचलेला नाही. या जीवनावश्यक सुविधांअभावी तेथील जनतेच्या जीवनमानावर परिणाम झालेला दिसून येतो या समस्यांबाबत येथील रहिवाशी कित्येक वर्षांपासून शासनाचे उंबरठे झिजवत आहेत. तेथील रहिवाशांनी वीज आणि रस्त्याचा प्रश्न सुटत नसल्याने तहसीलदारांना निवेदनाद्वारे सामुहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर १0 नोव्हेंबरला करुळ गावात प्रशासनाने आयोजित केलेल्या सिंधु समाधान योजनेच्या कार्यक्रमातही केगदवाडीच्या रहिवाशांनी वन खात्याच्या जमिनीमुळे होणाऱ्या वनवासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते आणि लोकमतने २२ नोव्हेंबरला व्यथा मांडली होती. त्यामुळे तहसीलदार गावीत यांनी या प्रश्नात लक्ष घातले आहे. त्यांनी येत्या गुरुवारी १७ रोजी वन, महावितरणसह गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, बांधकाम, पाणीपुरवठा विभागांच्या खातेप्रमुखांच्या उपस्थितीत केगदवाडी येथे खास बैठक आयोजित केली आहे. (प्रतिनिधी)या बैठकीत वनखात्याकडून ठोस भूमिका घेऊन विविध खात्याच्या अखत्यारीतील योजनाचा केगदवाडीचा विकास आराखडा बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.- जी. आर. गावीत, तहसीलदार