शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

खारेपाटण सोसायटीची प्रथमच निवडणूक

By admin | Updated: February 25, 2015 00:40 IST

काँग्रेस विरुद्ध सेनेमध्ये लढत : १३ जागांसाठी २५ जण रिंगणात

संतोष पाटणकर - खारेपाटण -खारेपाटण गटविकास सेवा सोसायटी लि. खारेपाटण या सहकारी संस्थेची यावर्षीची निवडणूकही रंगतदार होणार असून, संस्थेच्या आजपर्यंतच्या इतिहासात बिनविरोध म्हणून कायम संचालक निवडून जाणाऱ्या या संस्थेला प्रथमच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. एकूण २२४९ सभासदांच्या जोरावर १३ जागांसाठी एकूण २५ उमेदवार आपले भवितव्य अजमावित आहेत. खारेपाटण सोसायटीची निवडणूक ८ मार्चला सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत होणार असून, संपूर्ण खारेपाटण दशक्रोशीचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.खारेपाटण गटविकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीकरिता एकूण ४४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु, छाननीमध्ये ४ अर्ज बाद झाल,े तर १४ उमेदवारांनी आपले अर्ज निवडणुकीतून मागे घेतले. काँग्रेस पुरस्कृत पॅनलमधून प्रभाकर पोमेडकर हे एकमेव बिनविरोध निवडून आल्यामुळे आता काँग्रेस पक्षाचे एकूण १२ उमेदवार, शिवसेना पक्षाचे एकूण ११ उमेदवार, तर २ अपक्ष उमेदवार, असे मिळून एकूण २५ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून, काही विद्यमान संचालकांना मागे टाकून प्रथमच ते आपले भविष्य अजमावताना दिसत आहेत.काँग्रेस पुरस्कृत पॅनलमधून मनोहर चव्हाण, सूर्यकांत भालेकर, ईस्माईल मुकादम, एकनाथ कोकाटे, रवींद्र जठार, श्रीधर गुरव, विजय देसाई, महेंद्र मण्यार, रिना ब्रह्मदंडे, तृप्ती माळवदे, प्रमोद निग्रे, मंगेश गुरव, आदी १२ उमेदवार निवडणुकीत उभे आहेत. शिवसेना पक्ष पुरस्कृत पॅनलमधून चेतन हुले, रजित ब्रह्मदंडे, शिवाजी राऊत, प्रकाश नर, दयानंद कुडतरकर, शांताराम शेट्ये, महेश कोळसुलकर, मनस्वी कोळसुलकर, प्रदीप इस्वलकर, बाळकृष्ण नाथगोसावी, उदयकुमार बाबरदेसाई असे एकूण ११ उमेदवार निवडणूक लढवित आहेत; तर अपक्ष म्हणून वसीम ठाकूर आणि प्रदीप मोहिरे हे प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये शरद कर्ले, दादा कर्ले, सुधाकर कर्ले, अनिल पेडणेकर, लियाकत काझी, प्रमोद निग्रे, संतोष सरफरे, प्रकाश बाणे, मोहन पगारे, शोभा पाष्टे, तृप्ती माळवदे, भूपेश पाटणकर, मनोहर गोसावी, श्रद्धा देसाई, तर रमेश जामसंडेकर, रफिक नाईक, संतोष गाठे, विजय मण्यार या उमेदवारांचे अर्ज छाननीदरम्यान बाद ठरविण्यात आले. (वार्ताहर)दोन जागा काँग्रेसच्या पदरातएकूण १३ जागी संचालक निवडून येणार असून, अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रभानंद पोमेडकर हे बिनविरोध निवडून आल्यामुळे काँग्रेस पुरस्कृत पॅनेलचा हा प्लस पॉर्इंट मानला जातो. महिलांकरिता २ जागा राखीव असून, शिवसेना पुरस्कृत पॅनेलमध्ये फक्त १ महिला उमेदवार उभी असल्यामुळे जवळजवळ दुसरीही एक जागा काँग्रेस पक्षाला मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. सोसायटीचा आजपर्यंतचा कारभार हा काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने कित्येक वर्षे सांभाळलेला असून, आजही निवडणुकीला सामोरे जात असताना १३ जागांपैकी जवळजवळ २ जागा या काँग्रेस पक्षाकडे आल्यात जमा असून, उर्वरित ११ जागांपैकी ५ जागा जरी त्यांना मिळाल्या तरी सोसायटीवर काँग्रेस पुरस्कृत पॅनेलच सहज विराजमान होऊ शकते. अशा आहेत जागा...या निवडणुकीत अनुसूचित जाती, व्यक्ती १, भटक्या जाती, विमुक्त जाती १, इतर मागासवर्गीय १, महिला वर्ग २, सर्वसाधारण कर्जदार गट ८ असे जागांचे आरक्षण ठेवण्यात आले असून, पुढीलप्रमाणे उमेदवार उभे आहेत. यात अनुसूचित जाती बिनविरोध निवड, भटक्या जाती १ जागा २ उमेदवार, इतर मागासवर्गीय उमेदवार १ जागा ३ उमेदवार, महिला वर्ग २ जागा ३ उमेदवार, सर्वसाधारण कर्जदार गट ८ जागा १७ उमेदवार.