शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

‘आमच्या या घरात’ नाटकाला प्रथम क्रमांक

By admin | Updated: March 31, 2015 00:30 IST

केळूस येथील नाट्यस्पर्धा : होडावडेचे ‘दुरितांचे तिमिर जावो’ला द्वितीय क्रमांक

वेंगुर्ले : केळूस- कालवीबंदर येथील सामाजिक नाट्यस्पर्धेत श्री गौतमेश्वर नाट्यमंडळ, दाभोलीच्या ‘आमच्या या घरात’ सामाजिक नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. सिनेअभिनेते लवराज कांबळी यांच्या हस्ते रोख १५ हजार व फिरता चषक देऊन त्यांना गौरविण्यात आले. २१ ते २८ मार्च या कालावधीत पार पडलेल्या या नाट्यस्पर्धेत शिवशक्ती नाट्यमंडळ, होडावडा यांच्या ‘दुरितांचे तिमिर जावो’ या द्वितीय क्रमांक विजेत्या नाटकास दहा हजार रुपये, फिरता चषक, तर तृतीय क्रमांक विजेत्या कलाशुकलेंद्रू नाट्यमंडळ, पणजीच्या ‘कस्तुरी मृग’ या नाटकाला सात हजार व फिरता चषक देण्यात आला.रामनवमी महोत्सवांतर्गत नवतरुण उत्साही कला क्रीडा मंडळ, श्री विठ्ठल रखुमाई उत्सव कमिटी व कालवीबंदर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या नाट्यस्पर्धेचे आयोजन केले होते. श्री विठ्ठल रखुमाई रंगमंचावर पार पडलेल्या या नाट्यस्पर्धेचे उद्घाटन लक्ष्मण पाटील व माजी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती नीलेश सामंत यांच्या हस्ते झाले होते. बक्षीस वितरणप्रसंगी नाट्यकलाकार नंदू तळवडकर, नवतरुण उत्साही कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष केशव ताम्हणकर, उत्सव कमिटी अध्यक्ष बाबूराव ताम्हणकर, विलास खवणेकर, अशोक रेवणकर, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर सादये, शाळा नं. २ चे शिक्षक झिलू घाडी, दादू केळूसकर, जलमायी देवीचे मुंबई व्यवस्थापक दाजी केळूसकर, तुकाराम केळूसकर, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार कृष्णा रेवणकर यांनी मानले. स्पर्धेचे परीक्षण नाट्यकलाकार लवराज कांबळी, सिने अभिनेते नंदू तळवडकर यांनी केले. बक्षीस वितरणानंतर नवतरुण उत्साही कला क्रीडा मंडळ, कालवीबंदरचे ‘दिधले दान सौभाग्याचे’ हे नाटक झाले. (वार्ताहर)हे आहेत विजेते...वैयक्तिक प्रकारात पुरुष अभिनय-संजय नागडे (आमच्या या घरात), निशिकांत चोडणेकर (दुरितांचे तिमिर जावो), गोपाळ केरकर (कस्तुरी मृग, पणजी). स्त्री अभिनय-निर्मला टिकम (आमच्या या घरात), कल्पना देशपांडे (कस्तुरी मृग), शशिकला दाभोलकर (जन्मठेप). उत्कृष्ट खलनायक -विठ्ठल करंगुटकर (जन्मठेप). उत्कृष्ट दिग्दर्शक -अर्जुन हळदणकर (आमच्या या घरात), डॉ. विजय स्थळी (कस्तुरी मृग), निशिकांत चोडणेकर (दुरितांचे तिमिर जावो). तांत्रिक विभागात प्रकाश योजना-प्रणीत मयेकर (दुरितांचे तिमिर जावो), राकेश मेस्त्री (ब्रेकिंग न्यूज), श्रीकांत चेंदवणकर (आमच्या या घरात). पार्श्वसंगीत-आश्लेषा नाईक (कस्तुरी मृग), मनोज चेंदवणकर (आमच्या या घरात), तृतीय-प्रसाद जोशी (दुरितांचे तिमिर जावो). उत्कृष्ट नेपथ्य-शरद कांबळी (दुरितांचे तिमिर जावो), सुभाष मेस्त्री (ब्रेकींग न्यूज), रघुवीर रंगमंच (आमच्या या घरात). वैशिष्ट्यपूर्ण अभिनय प्रकारात दत्ता साई (ब्रेकींग न्यूज, मालवण), तर द्वितीय क्रमांक चंद्रशेखर जुवेलकर (जन्मठेप-उभादांडा), विनोदी भूमिका-सागर मेस्त्री (ब्रेकींग न्यूज), जगदीश धुरी (दुरितांचे तिमिर जावो, होडावडा) यांना गौरविण्यात आले.