शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
3
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
4
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
5
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
6
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
7
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
8
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
9
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
10
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
11
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
12
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
13
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
15
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
16
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
17
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
18
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
19
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
20
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...

तंत्रशिक्षण प्रशिक्षणासाठी पहिली तुकडी डहाणूला रवाना

By admin | Updated: May 13, 2016 00:14 IST

तंत्रशिक्षणाला नवी चालना : सावंतवाडीतील भोसले संस्थेचा रिलायन्स संस्थेशी करार

सावंतवाडी : विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आज तंत्रशिक्षण काळाची गरज बनले आहे. तंत्रशिक्षणाच्या पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष काम करण्याची पद्धती अवगत झाली तर सखोल ज्ञान मिळतेच; पण त्याचबरोबर या क्षेत्रातील नोकरीसाठीही ते महत्त्वाचे असते. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक संस्थेने याच गरजेतून रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार भोसले पॉलिटेक्निकमधील इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल शाखांमधील विद्यार्थ्यांची तुकडी सात दिवसांच्या प्रशिक्षणासाठी डहाणूला रवाना झाली. जिल्ह्यातील अशा प्रकारचा पहिल्याच करारामुळे तंत्रशिक्षणातील मुलांना कंपनीच्या विविध विभागांमध्ये चालणारे कामकाज जवळून अनुभवता येणार असून, समूह मुलाखती, कंपनीचे वैयक्तिक पातळीवरील प्रशिक्षण, कंपनीचे प्रमाणपत्र आदींसह या क्षेत्रातील नोकरीच्या संधीही मिळण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे हा करार म्हणजे सावंतवाडीच्या तंत्रशिक्षणाला नवी दिशा मानला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक (सावंतवाडी) व रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यानुसार रिलायन्सअंतर्गत कार्यरत असणाऱ्या डहाणू थर्मल पॉवर स्टेशन, डहाणू (जि. पालघर) येथील कंपनीमार्फत भोसले पॉलिटेक्निकमधील इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल शाखांमधील विद्यार्थ्यांना कंपनीच्या प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी प्रशिक्षण मिळणार आहे. कंपनीचा ५०० मेगावॅट क्षमतेचा विद्युतनिर्मिती प्रकल्प १९९५ पासून कार्यरत आहे. रिलायन्स व भोसले पॉलिटेक्निकमधील करारामध्ये भविष्यात विद्यार्थ्यांना कंपनीच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र, विद्यावेतन सुविधा तसेच कॅम्पस मुलाखतीद्वारे कंपनीमध्ये नोकरीची संधी, आदी गोष्टी समाविष्ट आहेत. रिलायन्ससारख्या कंपनीबरोबर हा करार झाल्याने विद्यार्थ्यांना देशातील मोठ्या आस्थापनामध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.या करारानुसार भोसले पॉलिटेक्निकमधील इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल शाखांमधील विद्यार्थ्यांची एक तुकडी विभागप्रमुख प्रा. डी. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसांच्या प्रशिक्षणासाठी डहाणूला रवाना झाली. (वार्ताहर)