शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

दारू पकडताना हवेत गोळीबार

By admin | Updated: July 8, 2015 00:20 IST

हातिवलेतील घटना :उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची कारवाई, दोघे ताब्यात, ४ लाखांची दारू जप्त

राजापूर : चोरटी दारू वाहतूक करणाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार राजापूर तालुक्यातील हातिवले येथे सोमवारी मध्यरात्री घडला. त्यामुळे उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी हवेत गोळीबार करून ओम्नी चालकासह अन्य एकाला ताब्यात घेतले आहे. यावेळी दारूचे ४० बॉक्स ताब्यात घेतले असून, त्याची किंमत ४ लाख ४० हजार ४०० रुपये आहे. या गोळीबाराची मोठी चर्चा दिवसभर तालुक्यात सुरू होती.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लांजा उपनिरीक्षक प्रमोद शंकर कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कांबळे यांनी आपले सहकारी सुरेश शेगर व तुषार विचारे यांच्या मदतीने महामार्गावर हातिवले येथे सापळा रचला होता. सोमवारी मध्यरात्री गोव्याकडून येणाऱ्या सर्व गाड्या तपासल्याजात असताना मध्यरात्री २.३० ते ३.०० च्या सुमारास एक करड्या रंगाची मारुती ओम्नी गाडी भरधाव वेगाने आली. ही गाडी अडविण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला असता चालकाने ती न थांबवता अधिक वेगाने पळवली. त्यामुळे अधिकाऱ्यांचा संशय अधिकच बळावला व त्यांनी लागलीच गाडीचा पाठलाग सुरू केला. सतत दोन-तीनवेळा चकवा देऊन पळण्यात यशस्वी झालेल्या ओम्नी चालकाने आपली गाडी महामार्गावरून तालुक्यातील विखारे गोठणेकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळवली. त्यानंतर पाठोपाठ आलेल्या उपनिरीक्षक प्रमोद कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता चालकाने बाजू न दिल्याने अचानक ओम्नी गाडीला मागून उत्पादन शुल्कच्या गाडीची धडक बसली व ओम्नीचा वेग मंदावला. त्यानंतर ओव्हरटेक करून कांबळे यांनी त्यांना थांबवण्यात यश मिळवले. आपल्या सहकाऱ्यांसह कांबळे मारुती तपासत असताना चालकाने अचानक पुन्हा गाडी पळवण्याचा प्रयत्न केला व कांबळे यांच्या अंगावर गाडी घातली. त्यामुळे त्यांनी आपल्याजवळील सर्व्हीस रिव्हॉल्व्हरमधून हवेमध्ये दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे घाबरून गेलेल्या ओम्नी चालकाने जागेवरच गाडी थांबवली. नंतर उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक प्रमोद कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ मारुती ओम्नीमधील दोघांनाही ताब्यात घेतले व गाडीची तपासणी सुरू केली. त्यावेळी गाडीमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली. त्या दारू व ओम्नीचा उत्पादन शुल्क विभागाने ताबा घेतला व चालक प्रदीप विश्वनाथ निग्रे (४९) आणि दत्ताराम रामचंद्र राऊत (५४, दोघेही खारेपाटण) यांना ताब्यात घेतले . त्यांच्याविरुध्द भारतीय दंड विधान कलम ३०७ , ३५३ , ३४ व मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५, अ, इ, ८१, ८३, ९० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी मारुती ओम्नीसह गोवा बनावटीच्या दारूचे ४० बॉक्स ताब्यात घेतले असून, त्याची एकत्रित किंमत ४ लाख ४० हजार ४०० एवढी असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी जयश्री जाधव यांनी दिली आहे. तपास राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. ओठवणेकर करीत आहेत. यांनी चिक्की मातीमिश्रित असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तेव्हापासून नगरसह राज्यभर चिक्की प्रकरण गाजत आहे. सर्वसाधारण सभेच्या मागणीनुसार चिक्कीच्या पुरवठादारावर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यासाठी आधी चिक्कीचे नमुने तपासण्याचे ठरले. दोन नमुने मुंबई आणि पुण्यातील शासकीय तर तीन नमुने एनएबीएल या शासन पुरस्कृत प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. शासकीय प्रयोगशाळेच्या नमुन्यांचा चाचणी अहवाल मंगळवारी महिला आणि बालकल्याण विभागाला प्राप्त झाला. चिक्की खाल्ल्यानंतर मातीमिश्रित असल्याचे जाणवले होते. मात्र, तपासणी अहवालात तसा उल्लेख नसल्याचे गुंड यांनी सांगितले. तर अहवाल काहीही आला तरी आता विद्यार्थ्यांची चिक्की खाण्याची मानसिकता राहिली नसल्याचे शेलार म्हणाले. पुरवठादारांनी चिक्की बदलून दिल्यास तिचे वाटप करण्यात येईल.अहवाल पाठविणारचिक्कीचे तीन नमुने सरकार पुरस्कृत खासगी प्रयोगशाळेकडे (एनएबीएल) पाठवण्यात आलेले आहेत. त्याच्या प्रत्येक नमुन्याची तपासणी फी जिल्हा परिषद भरणार आहे. तीन अहवाल आल्यानंतर ते सरकारला पाठवण्यात येणार असल्याचे शैलेश नवाल यांनी स्पष्ट केले.गोळ्या हवेत की गाडीवर?या प्रकरणात जप्त करण्यात आलेली एम एच 0८ आर १५२६ या करड्या रंगाच्या मारुतीची पुढील बाजूची काच फुटलेल्या अवस्थेत असल्याने आणि या गाडीच्या काचेवर गोळ्यांच्या खुणा असल्याने नेमक्या गोळ्या हवेत झाडल्या की गाडीवर? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या.स्वसंरक्षणार्थ गोळीबारमारुती चालकाने अंगावर गाडी घातल्याने उपनिरीक्षक प्रमोद कांबळे यांनी स्वसंरक्षणार्थ हवेत दोन गोळ्या झाडल्या, अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी जयश्री जाधव यांनी पत्रकारांना दिली.