शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भिरवंडे येथे घराला आग

By admin | Updated: February 27, 2017 21:21 IST

तालुक्यातील भिरवंडे येथील वरची परतकामवाडीतील घराला आग लागून 4 लाख 65 हजार 705 रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.

ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 27 - तालुक्यातील भिरवंडे येथील वरची परतकामवाडीतील घराला आग लागून 4 लाख 65 हजार 705 रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. आग लागली त्यावेळी घरात कोणीही नव्हते त्यामुळे मोठी हानी टळली. मात्र, आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.
भिरवंडे वरची परतकामवाडी येथे रवींद्र तुकाराम सावंत यांचे घर आहे. ते तालुक्यातील सावडाव हायस्कूल येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे कणकवली येथे ते रहातात. त्यांच्या भिरवंडे येथील घरात रायमन जॉन लोबो हे पत्नी एल्विन , मुलगा न्याल्विन यांच्यासह भाड्याने रहातात. सोमवारी रायमन लोबो कुटुंबियांसह कुंभवडे येथे पाहुण्यांकडे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नव्हते.
सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घराजवळील रस्त्यावरुन एक दुचाकीस्वार जात होता. त्याला घरातून धुर येताना दिसला. त्याने याबाबत सावंत यांच्या शेजाऱ्याना कल्पना दिली. भिरवंडे ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र सावंत , अमित सावंत, आद्राव डिसोझा, एरोन डिसोझा, सुधाकार सावंत, दत्ताराम खांबल आदी ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घराला आग लागल्याचे समजताच ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
घराशेजारील विहिरितील पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, सोमवारी विज प्रवाह बंद असल्याने विजेवरील पाण्याचे पंप सूरु करता आले नाहीत. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यास वेळ लागल्याने अधिक हानी झाली. या आगीबाबत रविंद्र सावंत तसेच रायमन लोबो यांना कल्पना देण्यात आली. त्यांना घटनेबाबत माहिती समजताच धक्काच बसला.ते घराजवळ तत्काळ दाखल झाले. 
या आगीत रविंद्र सावंत  यांच्या चिरेबंदी घराचे लाकडी छप्पर,  दरवाजे, खिडक्या , फर्निचर आदी लाकडी सामान तसेच इतर साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे त्यांचे 2 लाख 77 हजार 150 रुपयांचे नुकसान झाले आहे.  तर घरातील भाडोत्री रायमन लोबो यांच्या सोन्याच्या चार बांगड्या, दोन तोळ्याचे मंगळसूत्र, दोन तोळ्याचा हार, दोन अंगठ्या असे दागिने, कपडे, धान्य , भांडी , शैक्षणिक साहित्य व रोख 20 हजार रूपये आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. त्यामुळे लोबो यांचे 1लाख 88 हजार 555 रुपयांचे नुकसान झाले आहे. 
या घटनेबाबत माहिती समजताच उपसरपंच मिलिंद सावंत, मंडळ अधिकारी शरद कुलकर्णी, तलाठी अर्जुन पंडित, ग्रामसेवक राकेश गोवळकर, कोतवाल अरविंद सावंत, पोलिस पाटील बाळकृष्ण सावंत यांनी घटनास्थळी दाखल होत पहाणी करून पंचयादी घातली.