शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

अंत्यसंस्काराला अखेर ‘शेड’ची सावली

By admin | Updated: April 20, 2015 00:13 IST

नियोजन मंडळाची मंजुरी : जिल्ह्यात २८८८ स्मशानशेडच्या कामांना मंजुरी

रत्नागिरी : मरणानंतर तरी शांत चित्ताने ग्रामस्थाने जगाचा निरोप घ्यावा त्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करुन जिल्ह्यात २८८८ स्मशान शेड उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून मंजुरीही देण्यात आली आहे.जन्मापासून ते मरणापर्यंत जनतेला सोयीसुविधा देण्याचे धोरण शासनाने आखले आहे. मुलांचा जन्म होण्याआधीच गरोदर महिलांना योग्य आहार, तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी शासनाकडून घेण्यात येत आहे. त्यानंतर शिक्षणापासून आता अन्न धान्याची सोय तर केली आहेच. शिवाय मोफत औषधोपचार करण्यासाठी जीवनदायी योजना सुरु केली. त्यातून हजारो लोकांना मरणातून वाचवण्यासाठी कॅन्सर, हृदय विकारावरही उपचार करण्यात येत आहेत. विकासाबरोबरच जनतेला सर्वच सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे धोरण शासनाकडून राबविले जात आहे.शासनाचे विकासासाचे धोरण माणसाच्या अंतिम यात्रेपर्यंत म्हणजेच स्मशानभूमीपर्यंत जाऊन पोहोचले आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून जनसुविधा अंतर्गत स्मशान शेड उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हाभरातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. जिल्ह्याच्या सर्वच ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन आपल्या हद्दीतील स्मशानभूमींसाठी अवश्यक असलेली स्मशानशेडचे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे पाठविण्यात आले होते. ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील २८८८ स्मशानशेडचा आराखडा तयार केला होता. त्यानंतर तो प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठवण्यात आला होता. जनसुविधाअंतर्गत स्मशान शेड बांधकामासाठी १ लाख ९२ हजार रुपये देण्यात येत होते. वाढत्या महागाईसह शासनानेही विचार करुन त्यामध्ये वाढ करण्यात आली असून आता २ लाख ५२ हजार रुपये अनुदान दिले जात आहे. त्यामुळे या स्मशान शेडची कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी लागणार आहे. गेले अनेक दिवस काही स्मशानांमध्ये शेड नसल्याची ओरड जिल्हाभरात सुरू होती. मात्र, आता हा प्रश्नही अगदी लवकरच मार्गी लागणार आहे. (शहर वार्ताहर)तालुका मंजूर स्मशानशेडमंडणगड१८५दापोली२९६खेड१५२चिपळूण७२२गुहागर२६३संगमेश्वर५३१रत्नागिरी३१८लांजा३७८राजापूर ४३एकूण२८८८