शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

‘सी-वर्ल्ड’चा अंतिम आराखडा लवकरच

By admin | Updated: December 1, 2015 00:19 IST

काळसेकर : ग्रामस्थ, स्थानिक आमदारही अनुकूल

मालवण : भारतातील एकमेव अशा तोंडवळी-वायंगणी येथे प्रस्तावित जागतिक दर्जाच्या ‘ओशियानिक वर्ल्ड’ (सीवर्ल्ड) प्रकल्पाचा मार्ग सुकर बनला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर नुकतीच तोंडवळी-वायंगणी ग्रामस्थ आणि स्थानिक आमदार वैभव नाईक यांची मंत्रालयात बैठक पार पडली. यात जागामालक आणि आमदारांनी सकारात्मक भूमिका घेत प्रकल्पास अनुकूलता दर्शविली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे ३५० ते ४०० एकर या कमी जागेचा अंतिम आराखडा लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली आहे.तालुक्यातील तोंडवळी-वायंगणी येथील हा मोठा पर्यटन प्रकल्प अनेक वर्षे विरोध आणि राजकारण याच्या ग्रहणात सापडला आहे. प्रकल्पाबाबत अनुकूलता व आराखडा निश्चिती या काळसेकर यांच्या विधानाने प्रकल्पाचा मार्ग अधिक सुकर होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. १३७५ एकर जागेत यापूर्वी प्रस्तावित असलेला हा प्रकल्प ग्रामस्थांच्या विरोधानंतर भाजप सरकारने कमी जागेत आणला. सिंधू महोत्सवानिमित्ताने वर्षभरापूर्वी मालवणात आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रकल्प ओशियानिक वर्ल्ड असेल व तो ३५० ते ४०० एकरमध्ये साकारला जाईल असे स्पष्ट केल्यानंतर प्रकल्पाच्या नव्या आणि अंतिम आराखड्याच्या हालचालींना भाजप सरकारने गती दिली आहे.सी वर्ल्ड कमी जागेत होण्यासाठी भाजप प्रयत्नशीलकाळसेकर म्हणाले, पर्यटन राज्यमंत्री यांच्यासोबत आराखड्याच्या निश्चितीबाबत बैठका सुरू आहेत. लवकरच अंतिम आराखडा जाहीर होईल. कमी जागेतील या जागतिक दर्जाच्या प्रकल्पासाठी विरोध करणारी काही ग्रामस्थ मंडळी सहमत झाली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई येथे काही जागामालकांची बैठकही पार पडली. त्यातही जागा देण्याबाबत जागा मालकांनी सहमती दर्शवली आहे. शिवसेना आमदार नाईकही प्रकल्पाबाबत अनुकूल झाले आहेत, असे काळसेकर यांनी स्पष्ट केले. सी-वर्ल्ड तोंडवळी-वायंगणी येथेच कमी जागेत होण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे, असा विश्वास काळसेकर यांनी व्यक्त केला आहे.