शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

६0 प्रस्तावांना अखेर मान्यता

By admin | Updated: February 17, 2016 01:07 IST

वृद्ध कलाकार मानधन : एप्रिल २0१५ पासूनचे थकीत मिळणार

सिंधुदुर्गनगरी : रखडलेले वृद्ध कलाकार मानधनाचे प्रस्ताव मंजुरी करण्यासंदर्भात शासनाला अखेर जाग आली आहे. सन २०१२-१३ मधील वृद्ध कलाकारांच्या ६० प्रस्तावांना सांस्कृतिक कार्य संचनालय यांनी मान्यता दिल्याने या कलाकारांना एप्रिल २०१५ पासूनचे थकीत मानधन मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने १० लाख ८० हजारांचा निधी मंजूर केला आहे. या कलाकारांना दरमहा १५०० रुपये मानधन मिळणार आहे. असे असले तरी २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षातील १२० प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.वृद्ध कलाकारांना उतारवयात उदरनिर्वाह करता यावा, यासाठी शासनामार्फत मानधन देण्याची प्रक्रिया सुरुकरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जिल्हास्तरावर या प्रस्तावांना मंजुरी देऊन अंतिम मंजुरीसाठी शासनस्तरावर पाठविण्यात आले होते. सन २०१२-१३ मध्ये ६० प्रस्ताव व त्यानंतर पुढील दोन वर्षात १२० प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, त्यांना शासनाकडून मंजुरी मिळत नव्हती. बहुतांशी कलाकारांना उतारवयात मानधन हेच जगण्याचे साधन आहे. त्यामुळे या मानधनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, शासनाकडून हे प्रस्ताव मंजूर होत नव्हते. शासनाच्या अनागोंदी कारभारामुळे कलाकारांच्या मानधनाची रक्कम रखडली होती. सांस्कृतिक कार्य संचनालयाकडून रखडलेल्या सन २०१२-१३ च्या ६० प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या कलाकारांना दरमहा मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान यापैकी जे कलाकार हयात नाहीत, त्यांच्या वारसांच्या बँक खात्यात हे मानधन जमा होणार आहे. (प्रतिनिधी)...हे आहेत मंजूर झालेले प्रस्तावया लाभार्थ्यांमध्ये महादेव प्रभू, सुभाष मसुरकर, अंकुश पवार, परशुराम लाड, हरी परब, मधुकर रावराणे, बापू परब, तातोबा सकपाळ, गोपाळ सुतार, सखाराम शेट्ये, सोनू उगाडेकर, लाडोबा राणे, विश्वनाथ कदम, राघोबा गावडे, विजय राऊळ, प्रकाश सावंत, लक्ष्मण सावंत, गुरुनाथ वराडकर, राजाराम मेस्त्री, रमेश करंगुटकर, विजय परब, राघोबा चव्हाण, रुक्मिणी मसुरकर, भिकाजी सोन्सुरकर, मोहन अणसुरकर, आगापी फर्नांडिस, जयराम सावंत, प्रवीण पाटकर, अशोक मर्गज, लक्ष्मण कलिंगण, जयराम गावडे, पुंडलिक मोर्ये, चंद्रकांत भोगले, बाळकृष्ण पाटकर, अंकुश परब, रमाकांत पावसकर, चंद्रकांत मेस्त्री, चंद्रकांत शिरसाट, ज्ञानेश्वर हळदिवे, सदानंद राणे, सदानंद सुतार, नामदेव बांदल, केशव सावंत, गोविंद तावडे, गजानन राणे, कृष्णकांत कदम, प्रभाकर परब, किशोर मोरजकर, सदाशिव आळवे, बाळकृष्ण तांबे, यशवंत खोत, पांडुरंग वायंगणकर, अनंत सावंत, चंद्रकांत चव्हाण, प्रभाकर ठाकूर, गणेश लाड, काशिराम गावडे, विलास मसुरकर, लक्ष्मण गावडे, पंढरीनाथ काटकर यांचा समावेश आहे.