शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

लांजात पाचव्या दिवशी सर्वाधिक ३४ अर्ज दाखल

By admin | Updated: February 6, 2017 00:39 IST

काँग्रेसतर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन : जिल्हा परिषदेसाठी १०, पंचायत समितीसाठी २४ उमेदवारांचे अर्ज दाखल

लांजा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या आजच्या (रविवार) पाचव्या दिवशी सर्वाधिक म्हणजे एकूण ३४ अर्ज लांजा तालुक्यात दाखल करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी १० तर पंचायत समितीसाठी २४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यावेळी काँग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शन केले तर शिवसेनेनेदेखील शक्तीप्रदर्शनाचा जोरदार प्रयत्न केला. पाचव्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याने निवडणूक प्रशासनानेही जय्यत तयारी केली होती. रविवारी एकूण ३४ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. यामध्ये देवधे जिल्हा परिषद गटातून काँग्रेस-राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आघाडीचे उमेदवार प्रभाकर टोळे, देवधे गणातून सेनेच्या मानसी सिद्धेश्वर आंबोकर, बसपामधून सविता बाळकृष्ण आगरे तर शारदा शंकर गुरव यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. वेरवली बु. गणातून बसपामधून मिथुन अशोक कांबळे, सेनेकडून श्रीकांत नाना कांबळे, भाजपकडून अशोक सखाराम जाधव, भाजपचा डमी प्रसाद प्रभाकर जाधव यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भांबेड जिल्हा परिषद गटातून बसपातर्फे सविता बाळकृष्ण आगरे, सेनेकडून पूजा सुरेश नामे, भाजपकडून सोनिया शंकर गांधी, प्रभानवल्ली पंचायत समिती गणातून नीलम मांडवकर, भांबेड पंचायत समिती गणातून बसपामधून छाया जाधव, अजिमा खामकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. वाकेड गटातून बसपातर्फे सविता आग्रे, सेनेकडून पूजा आंबोळकर, काँग्रेसकडून अश्विनी पन्हळेकर, वाकेड गणातून बसपामधून सुरेश कांबळे, सेनेकडून अनिल कसबले, साटवली गणातून बसपाकडून समिता कांबळे, काँग्रेसकडून सुप्रिया माजळकर, सेनेकडून स्मिता बाणे यांनी तर स्मिता दळवी यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. गवाणे गटातून बविआकडून सृष्टी रेवाळे, सेनेकडून स्वरुपा साळवी, गवाणे गणातून बसपामधून चंद्रकांत गीते, काँग्रेसकडून मुनाफ दसुरकर, सेनेकडून लक्ष्मण मोर्ये, खानवली गणातून बसपाकडून चंद्रकांत गीते, सेनेकडून संजय घडशी, काँग्रेसकडून विश्वनाथ चौगुले, प्रकाश कदम, विनायक खानविलकर यांनी अर्ज दाखल केले. सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने गर्दी होणार आहे. (प्रतिनिधी)