शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाचव्या दिवशी ८४ अर्ज दाखल

By admin | Updated: February 6, 2017 00:35 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक : आजपर्यंत १७८ नामनिर्देशनपत्र प्राप्त

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी रविवारी जिल्हा परिषदेसाठी ३० तर पंचायत समित्यांसाठी ५४ अर्ज असे एकूण ८४ उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहेत. रविवारी पाचव्या दिवसापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ४९ तर पंचायत समित्यांसाठी ७८ असे एकूण १२७ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेरचे काही तास राहिले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. रविवार अखेरपर्यंत जिल्हा परिषदेसाठी २९६ अर्ज तर पंचायत समित्यांसाठी ४९३ उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरण्यात आले आहेत. यापैकी केवळ आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ४९ तर पंचायत समितीसाठी निवडणूक लढविणाऱ्या ७८ उमेदवारांनी आपल्या अर्जाची प्रिंट काढून त्या त्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केले आहेत. रविवारी पाचव्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी ३० तर पंचायत समित्यांसाठी ५४ अर्ज असे एकूण ८४ उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहेत. यामध्ये वैभववाडी पंचायत समिती गणातील उंबर्डेसाठी १ तर कोळपेसाठी २ अर्ज सादर करण्यात आले आहेत. कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद फोंडा, कलमठ व नाटळसाठी प्रत्येकी १ अर्ज तर पंचायत समिती कासार्डे, बिडवाडी, लोरे, वरवडे, कलमठ, नाटळ प्रत्येकी १ अर्ज आणि नरडवेसाठी २ अर्ज, देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद पुरळ, बापर्डे, शिरगाव प्रत्येकी एक अर्ज व पडेलसाठी दोन अर्ज तर पंचायत समिती तिर्लोट, पडेल, बापर्डे, तळवडे, किंजवडे प्रत्येकी एक व पडेल दोन अर्ज. वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा दोन अर्ज तर रेडी पंचायत समितीसाठी एक अर्ज, सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद माडखोल, कोलगांव, तळवडे, माजगाव, मळेवाड प्रत्येकी एक अर्ज तर पंचायत समिती माडखोल, कारिवडे, कोलगांव, मळगाव, तळवडे, माजगाव, इन्सुली, शेर्ले प्रत्येकी एक तर आंबोलीसाठी तीन अर्ज, दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद मणेरी दोन, साटेली-भेडशी तीन, माटणे एक अर्ज तर पंचायत समिती कोलझर, मणेरी, माटणे प्रत्येकी दोन, साटेली-भेडशी, झरेबांबर प्रत्येकी तीन अर्ज प्राप्त झाले आहेत. (प्रतिनिधी)