शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

फेस्टिव्हल संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवणार

By admin | Updated: January 3, 2015 00:14 IST

दिगंबर नाईक : मालगुंड बीच फेस्टिव्हलचे सूप वाजले

गणपतीपुळे : मालगुंड हा निसर्गसौंदर्याने नटलेला प्रदेश आहे. त्यामुळे हा बीच फेस्टिव्हल संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन सिने अभिनेता दिगंबर नाईक यांनी केले. मालगुंड येथील बीच फेस्टिव्हलच्या सांगता समारंभप्रसंगी ते बोलत होते.मालगुंड ग्रामपंचायत व पर्यटन समिती, मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सागरी महोत्सवाची सांगता नुकतीच झाली. यावेळी विनोदी अभिनेता दिगंबर नाईक उपस्थित होते. नाईक पुढे म्हणाले की, गतवर्षीपासून सुरू झालेल्या या महोत्सवात येथील पर्यटन समितीने आपल्याला नाटक करण्याची संधी प्राप्त करून दिली आणि तेव्हापासून मिळालेले येथील सर्वच सदस्यांचे प्रेम कायम आहे. हे प्रेम आपण कधीही विसरणार नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोकणात नाट्यप्रयोग करताना मालगुंड या शांत रमणीय ठिकाणी आपल्याला अधिकाधिक यायला आवडेल, असे नाईक म्हणाले.यावेळी नाईक यांचा मालगुंड ग्रामपंचायत व पर्यटन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही गौरवण्यात आले. त्यांचा समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, सदस्या सोनिया शिंदे, मालगुंड सरपंच साधना साळवी, आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त स्मिता जोशी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या सांगता सोहळ्यात नवीन वर्षाचे स्वागत फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रेक्षक आणि पर्यटकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात नवीन वर्षांचे स्वागत केले.मालगुंड येथे आयोजित या बीच महोत्सवाला नागरिक आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. या महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला. महोत्सवात पारंपरिक जाखडी नृत्य, मी संगमेश्वरी बोलतोय हा हास्यसम्राट आनंद बोंद्रे यांचा कार्यक्रम, जुन्या-नव्या गाण्यांची मैफल, या व्याकूळ संध्यासमयी हा राज्य नाट्य स्पर्धेतील तरल नाट्यानुभव, विनोदी अभिनेता दिगंबर नाईक दिग्दर्शित तुफान विनोदी मालवणी नाटक ‘अर्धी मस्ती-अर्धा ढाँग’ व साईश्रध्दा, मुंबई प्रस्तुत ‘मायबाप-माय मराठी’ हा आॅर्केस्ट्रा असे विविध कार्यक्रम पार पडले. (वार्ताहर)