शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वायंगणी शेती नामशेषची भीती

By admin | Updated: April 8, 2015 23:55 IST

भातपेरणीत दिवसेंदिवस घट : वन्यप्राण्यांचा उपद्रव, पाणीटंचाईची समस्या

सुरेश बागवे - कडावल -वायंगणी भातपेरणी क्षेत्राखाली दिवसेंदिवस घट होत आहे. सातत्याने होणारा वन्यप्राण्यांचा उपद्रव व पाणीटंचाईच्या समस्येमुळे शेतकरी याबाबत अनुत्सुकता दाखवत असून, भात उत्पादनाबरोबरच उत्कृष्ट प्रतीचे वैरणीचे गवत असा दुहेरी फायदा देणारी ही शेती पुढील काळात नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे. कडावल व हिर्लोक पंचक्रोशीत पूर्वीपासून वायंगणी शेती करण्यात येते. नारूर, कुसगाव, गिरगाव, हिर्लोक, किनळोस, रांगणा तुळसुली आदी गावांमध्ये विशेषत: वायंगणी भातपेरणीचे प्रमाण जास्त आहे. वायंगणी भातामुळे भात उत्पादनाबरोबरच गुरांसाठी उत्कृष्ट गवत असा दुहेरी फायदा मिळत असल्याने पूर्वी शेतकरी मोठ्या प्रमाणात भातपेरणी करत असत. शिवाय शेतात उन्हाळी हंगामातील वायंगणी भात पेरणी केल्यामुळे चरण्यासाठी मोकाट सोडण्यात येणाऱ्या गुरांना आपसूकच प्रतिबंध होतो. त्यामुळे गुरांकडून होणारे शेतबंधाऱ्यांचे नुकसान टळते. पाणी टंचाईच्या समस्येबरोबरच वन्य प्राण्यांच्या उपद्रवाचे सावटही या शेतीवर कायम आहे. गवा रेडे व रानडुकरांकडून वायंगणी पिकाचे सतत मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानेही शेतकरी आता वायंगणी भात पेरणीकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. परिणामी भात उत्पादन व वैरणीचे गवत असा दुहेरी फायदा देणारे ही पीक पुढील काळात नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे. (वार्ताहर)पाणीपुरवठ्याअभावी भात उत्पादनात घटवायंगणी शेती शेतकऱ्यांसाठी किफायतशीर असली, तरी या शेतीला पाणीटंचाईची झळ आता बसू लागली आहे. वायंगणी पिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शेत जमिनीतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने पाणी पुरवठ्याअभावी भात उत्पादनात घट येत आहे.