शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्र कोरडे पडण्याची भीती

By admin | Updated: March 31, 2015 00:19 IST

पाण्याचा अनियंत्रित उपसा : ओटवणे पंचक्रोशीतील समस्या

महेश चव्हाण - ओटवणे पंचक्रोशीतून वाहत जाणाऱ्या तेरेखोल नदीचे पात्र पाण्याच्या अनियंत्रित उपशामुळे कोरडे होऊ लागले आहे. याचा परिणाम म्हणून आगामी कडक उन्हाळ्याच्या दिवसात स्थानिक शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता जाणवणार आहे. ओटवणे पंचक्रोशीतून वाहणारी तेरेखोल नदी म्हणजे येथील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी आहे. मात्र, मार्च अखेरीस नदीने जमिनीची पातळी गाठल्याने पुढील दिवसात जाणवणाऱ्या कडक उन्हाळ्यात शेती, बागायतीसाठी पाणी कोठून आणायचे, हा गहन प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकणार आहे. पंचक्रोशीतील ओटवणे, विलवडे, सरमळे, भालावल, बावळाट, दाभिल, कोनशी आदी गावे या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या पाण्याचा वापर करून या गावातील स्थानिक शेतकऱ्यांनी माड पोफळीच्या बागांसह केळी, विविध तत्सम पिके तर कृषीक्रांतीत अग्रेसर असलेला विलवडे गाव भाजीपाल्याचे मोठे उत्पन्न याठिकाणी घेतो. पूर्णत: आर्थिक ऊलाढाल शेतीवरच असलेल्या या ग्रामस्थांसाठी नदी म्हणजे जीवनदायिनी आहे. मात्र, या जीवनदायिनीवर परप्रांतीय व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने पाणी आटू लागले आहे. परप्रांतीय व्यावसायिकांनी येथील सह्याद्री पर्वताच्या रांगांच्या रांगा हस्तगत करून त्याठिकाणी रबर पिकाचे शेतमळे पिकवले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी धरून आणि ग्रामस्थांना पैशाचे आमिष दाखवून येथील शेकडो एकर जमिनीवर केरळीयन व्यापाऱ्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या काबीज केलेल्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात रबर लागवड केली आहे. या रबर शेतीसाठी लागणारे पाणी डोंगररागांच्या पायथ्यालगत वाहणाऱ्या तेरेखोल नदीपात्रातून भरमसाट उपसा केले जात आहे. रबर पिकासांठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असल्याने नदीवर मोठ्या अश्वशक्तीचे पंप बसवून बेसुमार पाणीसाठा वापरला जातो. प्रथमत: या हस्तगत केलेल्या जमिनीवर केळी तसेच अननस लागवड करून फळपिकांचा काही वर्षे देखावा करण्यात आला आणि त्यामध्ये रबराची पिके घेण्यात आली. जसजशी वर्षे पुढे ढकलली आणि रबराची झाडे मोठी झाली, तशी केळी, अननस, इतर पिके कमी करून रबराच्या झाडावर लक्ष केंद्रीत करण्याची कल्पकता या व्यावसायिकांनी वापरली. आता सद्यस्थितीत पाहिले असता, सह्याद्रीच्या पर्वतरांगा पूर्णत: रबराच्या झाडांनी व्यापलेल्या आहेत आणि रबर पिके उत्पन्न देण्याच्या जवळ आल्याने आपूसकच तत्सम फळ पिकांची लागवड बंद झाली. रबर हे पीक असे आहे की, या पिकाला ओलसरपणा भरपूर लागतो. त्यावर त्याची वाढ आणि येणारा चिक अवलंबून असतो. त्यामुळे या पिकासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याच्या उपसा नदीतून केला जातो. त्यासाठी नदीवर मोठ्या पॉवरचे पंप बसविले. त्याशिवाय या उंच भागात मोठमोठाल्या विहिरी खोदून त्यामध्ये पाणी साठवणूक केल्याचे पहायला मिळते. पाण्याचा बेसुमार वापर तर होतोय, शिवाय हजारो लीटर पाणी वायाही जाते. नळपाणी पुरवठा धोक्याततेरेखोल नदीच्या पाण्यावर ओटवणे, विलवडे, इन्सुली, वाफोली, बावळाट आदी गावातील नळपाणी योजना कार्यान्वित आहे. पण मार्च अखेरीस केरळीयन परप्रांतियांच्या अतिक्रमणामुळे नदी कोरडी झाल्याने विंधन विहिरींना पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. अजूनही एप्रिल, मे हे कडक उन्हाळ्याचे महिने येणे बाकी आहे. त्यामुळे या नळपाण्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची पाण्यासाठी वणवण होणार आहे. त्यातच पावसाने अनियमितता दाखविली, तर दुष्काळजन्य परिस्थिती या भागात ओढवण्याची पाळी येईल. केरळीयन परप्रांतीयांच्या वाढत्या घुसखोरीवर आता त्वरित शासनस्तरावरून प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे व्यावसायिक करत असलेल्या पाणी उपशावर पूर्णत: निर्बंध लादून ठराविक पाणीसाठा त्यांनी दिवसागणिक उपसा करण्याचे नियम त्यांच्यावर लादण्यात यावेत. -एम. डी. सावंत,ओटवणे दशक्रोशी समिती अध्यक्ष