शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

पोलिस व्हॅनच्या धडकेत पिता-पुत्र जखमी

By admin | Updated: December 22, 2016 00:30 IST

सावंतवाडीत अपघात : पंचनाम्यापूर्वी वाहने हलविल्याने नागरिक आक्रमक; किरकोळ बाचाबाची

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील आपले काम संपवून कुडाळ-तेंडोलीच्या दिशेने घरी जाणाऱ्या पिता-पुत्राच्या दुचाकीला रुग्णालयासमोरच्या महामार्गावर पोलिस व्हॅनने धडक दिली. यात विजय बाबू वेंगुर्लेकर (वय ४५) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांचा मुलगा दुचाकीस्वार विनय वेंगुर्लेकर (२५) याला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना अधिक उपचारांसाठी बांबुळी-गोवा येथे हलविण्यात आले आहे.दरम्यान, अपघातानंतर पंचनामा करण्यापूर्वीच पोलिसांनी आपल्या व्हॅनची जागा बदलली. तसेच जखमीचे रक्त पडलेले ठिकाण अग्निशामक बंबाने धुऊन घेतल्याने नागरिक आक्रमक झाले होते. यावेळी पोलिस व नागरिक यांच्यात किरकोळ बाचाबाचीही झाली. मात्र, उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. हा अपघात बुधवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला.येथील उपजिल्हा रुग्णालयात कामानिमित्त आलेले विजय वेंगुर्लेकर व त्याचा मुलगा विनय वेंगुर्लेकर हे स्वत:ची दुचाकी (एमएच ०७ वाय ११२४) घेऊन घरी तेंडोलीला परतत असताना रुग्णालयाच्या जवळच्या उतारावर आले व कुडाळच्या दिशेने वळले. मात्र, त्याचवेळी महामार्गावरून सावंतवाडी पोलिस ठाण्याची व्हॅन (एमएच ०७ जी २०९७) घेऊन पोलिस प्रशांत सुरेश धुमाळे पोलिस ठाण्याच्या दिशेने जात असतानाच व्हॅन वेगात दुचाकीला धडकली. या धडकेत विजय वेंगुर्लेकर यांच्या पायाचे हाड व्हॅनच्या पुढच्या चाकात अडकले, तर डोके रस्त्यावर आदळले. तसेच हातालाही जोरदार दुखापत झाली. तर विनय याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तातडीने गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.अपघात झाला त्यावेळी पोलिस व्हॅनही रस्त्याच्या विरुद्ध दिशेला अपघातग्रस्त झाली होती. ती अचानक नेऊन एका बाजूला लावण्यात आली. हे काही प्रत्यक्षदर्शिंनी बघितले होते. मात्र, पोलिसांनी आपल्या गाडीला अपघात झालाच नाही, असा पवित्रा घेतला. तसेच नगरपालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी मागवून रस्त्यावर पडलेले जखमीचे रक्त धुतले. त्यामुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी पोलिसांना याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला; पण कोणीच अधिकारी सुरुवातीला समोर आले नाहीत. दरम्यान, घटनेची माहिती शहरात पसरली. शिवसेना शहरप्रमुख शब्बीर मणियार, बाळा कुडतरकर, भाऊ पाटील, बाबा आल्मेडा, आदींसह मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले. त्यांनी पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांना पंचनाम्यापूर्वी गाडी हलविल्याबद्दल जाब विचारला. तसेच कोणाच्या परवानगीने रक्ताचा सडा धुण्यात आला. अग्निशामक बंब कोणी बोलावला, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, पोलिस यातील एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत. अखेर पोलिसांनी नागरिकांच्या समक्ष पंचनामा केला. घटनास्थळावरून काही प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदविले आणि नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.नागरिक आक्रमक होत असल्याचे लक्षात येताच पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस हे अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळावरून लोकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. काहीनी आक्रमक होत पोलिसांशी हुज्जत घेतली. अखेर पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविण्याचा इशारा देताच नागरिक पांगले. हा प्रकार महामार्गावर तब्बल दोन तास सुरू होता. त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला होता.पोलिस उपनिरीक्षक जयदीप कळेकर, हेडकॉन्स्टेबल संजय हुबे, प्रवीण माने, राजू शेळके, प्रमोद काळसेकर, विकी गवस, मंगेश शिगाडे, आदींनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अपघाताचा अधिक तपास सावंतवाडी पोलिस करीत आहेत. (प्रतिनिधी)