शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मडुऱ्यातील काँग्रेस कार्यकर्त्याचा तापाने मृत्यू

By admin | Updated: September 18, 2015 23:38 IST

राजकीय चिकाटी असलेला कार्यकर्ता

बांदा : शिवसेनेचे माजी बांदा विभागप्रमुख व सध्याचे काँग्रेसचे कार्यकर्ते मदन राजाराम परब (वय ४८, रा. मडुरा-परबवाडी) यांचे गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी निधन झाले. ते पंधरा दिवस तापाने आजारी होते. गणेश चतुर्थीदिवशीच त्यांचे निधन झाल्याने परब कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.मदन परब यांनी ताप येऊ लागल्याने प्रथम बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले. मात्र, ताप कमी होत नसल्याने त्यांना सावंतवाडी येथे खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, ताप व त्यातच कावीळ झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात दाखल केले होते. गेले दहा दिवस त्यांच्यावर गोवा येथे उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले. मदन परब हे गोवा राज्यात शिवसेनेच्या माध्यमातून कार्यरत होते. गोव्यात कार्यरत असताना केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विरोधातही मदन परब यांनी विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. (प्रतिनिधी)राजकीय चिकाटी असलेला कार्यकर्तात्यांच्या राजकीय चिकाटीचे व आक्रमकपणाचे त्यावेळी पर्रीकर यांनी देखील कौतुुक केले होते. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर मदन परब यांनी बांदा येथे येत शिवसेनेचे कार्य सुरू केले. त्यावेळी त्यांच्याकडे विभागप्रमुख पदाचा कार्यभार देण्यात आला होता. सेनेचे कार्य सुरू केल्याने त्यांना राणे समर्थकांकडून वेळोवेळी त्रासही देण्यात आला. विरोध झुगारुन त्यांनी काही कार्यकर्त्यांच्या बळावर शिवसेनेची बांद्यात पहिली शाखा पोलीस बंदोबस्तात सुरू केली होती. बांदा परिसरात त्यांनी शिवसेनेच्या वाढीसाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, सेनेतील वरिष्ठांकडून त्यांना वेळोवेळी डावलण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी लोकसभा निवडणुुकीत नीलेश राणे यांचे काम केले होते. त्यानंतर ते आजपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते. आजारपणामुळे ते राजकारणापासून दूर होते.