शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

पोलिसांविरोधात उपोषण करणार

By admin | Updated: December 1, 2014 00:16 IST

तक्रार करुनही कारवाई नाही : मुंज कुटुंबीयांचा निवेदनातून इशारा

सावंतवाडी : सतीश राजाराम ठोंबरे (रा. सावंतवाडी) यांच्यावर महाराष्ट्र नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८३ नुसार कारवाई करण्याबाबत दुय्यम निबंधक श्रेणी १ सावंतवाडी यांनी सावंताडी पोलीस ठाण्यात ३० मे २०१४ रोजी एफआयआर क्र. ३००९ वर्ष २०१४ अन्वये दाखल करूनही सावंतवाडी पोलीस याबाबत कोणतीही कारवाई करत नसल्याने येथील साईनाथ राजाराम मुंज ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून कुटुंबीयांसमवेत उपोषणास बसणार आहेत. २९ एप्रिल २०१३ रोजी नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) महाराष्ट्र, पुणे यांच्या कार्यालयाकडे रद्द केलेल्या कुलमुखत्यार पत्राद्वारे बेकायदा खरेदी क्र. २१६४/१२ संगनमत करून रजिस्टर केल्याप्रकरणी हे खरेदीखत करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी साईनाथ मुंज यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता.नोंदणी उपमहानिरीक्षक मुख्यालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाकडील १ जुलै २०१३ च्या पत्राने प्रस्तुत प्रकरणी नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ अन्वये गुन्हा ठरणारे कृत्य घडले असल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आले.त्यानुसार फौजदारी प्रक्रिया करण्यास कलम ८३ अन्वये सतीश राजाराम ठोंबरे, सावंतवाडी यांच्यावर सक्षम न्यायालयात अभियोग दाखल करण्यास दुय्यम निबंधक श्रेणी १ सावंतवाडी यांना ७ एप्रिल २०१४ जा. क्र. सर्जिनिसि/तक्रार/१२८१-८२/२०१४ अन्वये जिल्हा निबंधक तथा अप्पर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या परवानगीप्रमाणे दुय्यम निबंधक श्रेणी १ सावंतवाडी यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये ३० मे रोजी एफआयआर क्र. ३००९ वर्ष २०१४ अन्वये दाखल करूनही सावंतवाडी पोलीस संबंधिताविरुद्ध सक्षम न्यायालयात अभियोग दाखल करण्यास जाणूनबुजून या व्यक्तींशी संगनमत करून टाळाटाळ करीत आहेत. याबाबत वारंवार विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तसेच जास्त चौकशी केल्यास केस फिरवून टाकू, अशी धमकीही दिली जात आहे. याविरोधात ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून कुटुंबासमवेत उपोषणास बसणार असल्याचे सावंतवाडी येथील मुंज कुटुंबियांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)