शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

पावसाने शेतकरी, व्यापारी त्रस्त

By admin | Updated: May 21, 2015 00:11 IST

उलाढाल मंदावली : आंब्यांचे नुकसान वाढले; किरकोळ भाज्यांवरच समाधान

प्रसन्न राणे - सावंतवाड तालुक्यात सातत्याने पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे सत्र थांबता थांबत नाही. यामुळे शहरातील बाजारात मोठ्या प्रमाणावर होत असेलली फळे, भाज्या तसेच अन्य पदार्थांची उलाढाल मंद गतीने होताना दिसत आहे. शेतकरी, व्यापाऱ्यांना दररोज नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ््यामध्येच पावसाने धरलेला जोर शेतकऱ्यांसाठी नुुकसानीचा ठरला होता. मात्र, त्यातून सावरत असताना पावसाने जोर कायम ठेवला. यामुळे शेतकरी वर्ग, त्यावर अवलंबून असणारा व्यापारी वर्ग मोठ्या अडचणीत आला होता. काही दिवसांनंतर पुन्हा अवकाळी पावसाने जोर धरत आजपर्यंत अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांची पूर्णत: नासधूस केली आहे. यामुळे शेवटच्या पिकावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सत्र थांबता थांबत नाही. तालुक्यात उन्हाळ््यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात उलाढाल होते ती म्हणजे आंबा, काजू या पिकांची. मात्र, या फळांना पावसाने सुरुवातीपासूनच घेरल्याने त्यावर अवलंबून असणारे शेतकरी व व्यापारी अडचणीत आले आहेत. त्यातून सावरत असताना अवकाळी पावसाने आपला जोर कायम ठेवल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. अवकाळी पावसाने बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात मंदी आलेली दिसून येत आहे. शेतकरी पूर्णत: अडचणीत असल्याने पूर्वीप्रमाणे बाजारपेठ फुलून दिसत नाही. बारीकसारीक भाज्यांची विक्री करून शेतकऱ्यांना समाधान मानावे लागत आहे.पावसाळ््याआधीच नैसर्गिक आपत्तीअवकाळी पावसाचे सत्र गेले चार महिने थांबतच नसल्याने काजू, आंबा या पिकांनंतर फळभाज्यांनाही त्रासदायक ठरत असल्याचे दिसत आहे. गेले आठ दिवस पुन्हा अवकाळी पावसाने आपला जोर कायम केला असल्याने फळभाज्यांची विक्रीही कमी होताना दिसत आहे. यातच गावातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. चौकुळ, आंबोली, सावंंतवाडी, बांदा, कोलगाव, डिंगणे, इन्सुली या भागात मोठ्या प्रमाणात वादळी पावसाचा फटका बसल्याने नैसर्गिक आपत्तींनाही शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. गावातील अनेक भागांचे पंचनामे सुरू आहेत.आंब्याचा दर २00 रूपयांपर्यंत घसरलापूर्वी मे महिन्यात सावंतवाडी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आंबे, फणसांची उलाढाल होताना दिसत होती. मात्र, आता अवकाळी पावसामुळे क्वचितच व्यापारी आंबे विक्री करताना दिसत आहेत. तेही अत्यंत कवडीमोल किमतीने. व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. ८०० ते १००० रुपये प्रतिकिलो आंब्याचा दर आता २०० ते ४०० रुपयांपर्यंत घसरला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि व्यापारी मोठ्या अडचणीत आले आहेत.