शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी खुशीत तर कारखानदार चिंतेत

By admin | Updated: March 18, 2017 21:02 IST

योग्य दर मिळेना : काजूची आवक स्थिर; खर्च-उत्पादनाचा बसेना मेळ

कडावल : काजू उत्पादन यंदा कमी असले तरी स्थानिक बाजारपेठेत काजूला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे; पण कच्च्या मालाचे वाढलेले दर आणि तुलनेत काजूगराला अपेक्षित दर मिळत नसल्याने काजू कारखानदारांसमोर संकट उभे राहिले आहे. यामुळेच गतसाली ऐन हंगामात बंद पडलेल्या कारखान्यांच्या विचाराने काजू कारखानदार धास्तावले आहेत.बाजारपेठेत काजूची आवक काहीशी स्थिर असून, आसपासच्या खेड्यातील शेतकरी आपल्याकडील काजू विक्रीसाठी आणत आहेत. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच काजूला प्रतिकिलो १६० ते १७० रुपयांच्या दरम्यान चांगला बाजारभाव मिळत आहे. काजूची आवक स्थिर असली तरी आणखी काही दिवसानंतर ती वाढेल, असा विश्वास व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे.काजूला मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे शेतकरी खुशीत असले, तरी काजू कारखानदार मात्र चिंताग्रस्त झाले आहेत. काजूची खरेदी करण्यासाठी त्यांना अधिक प्रमाणात खर्च करावा लागत आहे. तसेच मजुरी, पॅकिंग व वाहतूक इत्यादींसाठीही मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. त्यामुळे काजूगर उत्पादनासाठी येणारा खर्च व उत्पादनाला मिळणारा दर यात बरीच तफावत येते. या समस्येमुळेच गेल्या वर्षी अनेक लहान-मोठे काजू कारखाने बंद ठेवावे लागले होते. या गोष्टीची पुनरावृत्ती होण्याच्या भीतीने येथील काजू कारखानदार धास्तावले आहेत.जिल्ह्यातील अनेक तरुणांनी बँकेचे कर्ज काढून काजू कारखाने सुरू केले आहेत. या उद्योगापासून रोजगार निर्मितीलाही चालना मिळत आहे. मात्र, या उद्योगाचा कच्चा माल म्हणजे काजू बीच्या किमती वाढल्यामुळे काजू कारखानदारांसमोर अडचण निर्माण झाली आहे. काजू बी तयार करून तो बाजारात आणण्यासाठी त्यावरील प्रक्रियेचा खर्च पाहता बाजारपेठेत तयार काजू बीला आवश्यक दर मिळत नाही. त्यामुळे कारखानदारांची कोंडी होत असून, सर्व कारखान्यांसमोर यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कारखाने कसे सुरू ठेवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. (वार्ताहर)एक किलो चांगल्या प्रतीचा गर मिळण्यासाठी चार किलो काजू फोडावी लागते. आज काजू किमान १६० रुपये प्रतिकिलो असून, त्याच्या प्रक्रियेसाठी मजुरी, पँकिंग, वाहतूक व इतर खर्चाचा विचार करता बाजारात काजूगराला मिळणारा दर परवडत नाही. - बाळकृष्ण ठाकूर, काजू कारखानदार, कडावल