शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

विमा योजनेपासून शेतकरी वंचितच...

By admin | Updated: January 20, 2015 00:05 IST

लांजा तालुका : नुकसानग्रस्तांची प्रतिक्षा कायम.

रत्नागिरी : लांजा तालुक्यात समाविष्ट असलेल्या पूनस महसूल विभागातील शेकडो आंबा बागायतदार शासनाच्या फळपीक विमा योजनेपासून दोन वर्षे वंचित आहेत. वार्षिक हप्ता भरूनही अद्याप त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. संबंधित विभागाकडून स्वयंचलित तापमानमापक यंत्रणा अद्याप उपलब्ध झाली नसल्याने ही रक्कम रखडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.राज्यात हवामानावर आधारित पथदर्शक फळपीक विमा योजना राबविली जात आहे. अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या या योजनेत राज्य शासनाचा ५० टक्के आणि शेतकऱ्यांचा ५० टक्के असा सहभाग आहे. पूनस (ता. लांजा) क्षेत्रात खानू मठ, पूनस, नांदिवली, पूनस, देवधे, वेरळ, आंजणारी, नांदिवली, शिरंबवली, कुर्णे आदी गावांचा समावेश आहे. प्रतिझाड ६० रूपये इतकी विमा रक्कम असून नुकसान झाल्यास १००० रूपये भरपाई मिळते. पूनस क्षेत्रातील शेकडो शेतकरी, सहकारी बँका तसेच सोसायटी यांच्यामार्फत प्रतिवर्षी पीककर्ज घेतात. बँकेकडून या कर्जावर पीकविम्याचा हप्ता भरून घेतला जातो. गावातील शेकडो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी २०१३ - १४ आणि २०१४ - १५ या दोन्ही वर्षाचे लाखो रूपयांच्या पीक विमा कर्जाचे वार्षिक हप्ते संबंधित बँकांकडे अदा केलेले आहेत. मात्र, ज्यांचे नुकसान झाले आहे, त्या आंबा बागायतदारांना अजूनही विम्यापोटी भरपाई मिळालेली नाही. पूनस क्षेत्रात स्वयंचलित तापमानमापक यंत्र उपलब्ध नसल्याने या शेतकऱ्यांना दोन वर्षे हा लाभ मिळाला नसल्याची माहिती नांदिवलीतील शेतकरी सतीश सरपोतदार यांनी दिली.या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी कृषी विभागापासून अगदी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. मात्र, अजूनही त्याची तड लागलेली नाही. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी याबाबत आपण कृषी विभागाला कळविल्याचे सांगितले. मात्र, कृषी विभागाने याबाबतची कुठलीच सूचना अद्याप कंपनीेकडून आली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या गोंधळामुळे शेकडो शेतकऱ्यांचा फळपीक विमा योजनेवरील विश्वास उडाला आहे. (प्रतिनिधी)कंपनीने स्वयंचलित तापमानमापक यंत्रणेचा गैरवापर होऊ नये, यासाठी यंत्रणा कुठे बसविली आहे, ते गोपनीय ठेवले आहे. त्याबाबत कृषी अधीक्षक कार्यालयालाही काही माहिती देण्यात येत नाही. शेतकऱ्यांनी सलग दोन वर्षे या योजनेसाठी हप्ते भरले . पत्रव्यवहारही आहे. कंपनीनेच खुलासा करावा.- व्ही. एस. वैद्य, पर्यवेक्षक, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय, रत्नागिरी