शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
3
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
4
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
5
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
6
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
7
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
8
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
9
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
10
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
11
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
12
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
13
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
14
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
15
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
16
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
17
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
18
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
19
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
20
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?

फणसगाव कॉलेजचे पथनाट्य प्रथम

By admin | Updated: December 27, 2014 00:03 IST

उडाण महोत्सव : साळगाव अध्यापक विद्यालयातील कार्यक्रम

फणसगांव : मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विभागाच्यावतीने कुडाळ तालुक्यातील प्रमोद धुरी अध्यापक विद्यालय साळगाव येथे आयोजित केलेल्या उडाण महोत्सव २०१४ मध्ये फणसगाव कॉलेजच्या ‘फेस्टिव्हल’ या पथनाट्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. सध्याच्या जगात सण साजरे करताना वापरली जाणारी आधुनिकता त्यामुळे ढासळत चाललेली संस्कृती व त्याचे होणारे वाईट परिणाम या विषयावरील प्रबोधनात्मक व बहारदार सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. मागील वर्षापासून फणसगाव कॉलेजने सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात एका पाठोपाठ एक स्पर्धांमध्ये चकमदार कामगिरी करीत यश संपादन केले आहे. त्यामुळे या महाविद्यालयाने या क्षेत्रात एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. कोणत्याही स्पर्धेत उतरताना ते बाजी मारायचीच हा विचार पक्का करूनच सहभागी होतात. अर्थातच यामागे या विद्यार्थ्यांची जिद्द व रात्रीचा दिवस करून केली जाणारी मेहनत महत्त्वाची आहे. या संघाला मुंबई विद्यापीठाचे आजीवन अध्ययन विभागाचे संचालक डॉ. दिलीप पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत संघांनी सहभाग घेतला होता. फणसगाव महाविद्यालयाच्या चमूमध्ये शिल्पा घोरपडे, प्राची पवार, रोशन सोये, प्राजक्ता गुरव, स्नेहल पाटील, आशिष घाडी, अक्षय घाडी, अक्षय पाळेकर, अनिकेत खाडये, सागर जाधव या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या सर्व विद्यार्थ्यांना प्रसिद्ध दिग्दर्शक व लेखक कुणाल जामसंडेकर, सिंधुदुर्ग जिल्हा सांस्कृतिक समन्वयक प्रा. आशिष नाईक व प्रा. ज्योत्स्ना कदम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)