शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अपंगत्त्वावर मात करत सांभाळतोय कुटुंबाचा डोलारा

By admin | Updated: March 28, 2015 00:09 IST

प्रवीण मोहिते : धान्य दुकानात लेखनिकाचे करतोय काम

मंदार गोयथळे - असगोली-घरची परिस्थिती एकदम बेताची. त्यातच बालपणीच दोन्ही पायांना अपंगत्त्व आलेले यामुळे जगण्याची इच्छा जणू लहानपणीच मोडली. मात्र, जन्मताच निर्माण झालेल्या या परिस्थितीपुढे न झुकता सुरळ बौद्धवाडी येथील प्रवीण प्रकाश मोहिते हा तरुण मढाळ - पाली - सुरळ येथील सोसायटीच्या रास्त धान्य दुकानात लेखनीकाचे काम करुन आपल्या कुटुंबाचा डोलारा सांभाळतो आहे.-एखाद्याच्या आयुष्यात जन्मत: अपंगत्त्व येणे हे ज्याचे - त्याचे नशीब ठरवते. मात्र, अपंगत्त्वामुळे एखाद्याचे आयुष्यदेखील हे नशीबच बदलून टाकते, असे वारंवार बोलले जाते. परंतु, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अपंगत्त्वासारख्या कठीण परिस्थितीवर मात करुन यश मिळवलेल्या व्यक्ती आजही समाजात पाहावयास मिळतात. प्रवीणदेखील अशाच व्यक्तीच्या पंक्तीत बसतो. मूळचा सुरळ बौद्धवाडी येथील असलेला प्रवीण मोहिते हा तरुण कुटुंबात सर्वात मोठा असून सहाजिकच आपल्या घराचा डोलारा सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. याच सर्व परिस्थितीचे भान ठेवून प्रवीण आपले मार्गक्रमण करत आहे. इयत्ता १०वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रवीणच्या कुटुंबात अन्य कोणीच कमावणारी व्यक्ती नसल्याने अपंगत्त्वातही त्याच्यावर जणू मोठे ओझे येऊन पडले. मात्र, या सर्व परिस्थितीचा विचार न करता प्रवीण सध्या उदरनिर्वाहासाठी मढाळ - पाली - सुरळ सोसायटीच्या रास्त धान्य दुकानात लेखनिकाचे काम करत आहे. मुळातच रास्त धान्य दुकानामधून मिळणारा पगार बेताचाच. मात्र, अशाही परिस्थितीशी जुळवून घेत प्रवीण आजही आपली नोकरी सांभाळून करतोय. लेखनिकाचे काम करता करता आपल्या रास्त धान्य दुकानाच्या शासकीय कामासाठी दोन्ही हातातील कुबड्या घेऊन तो तालुक्याचा प्रवास करतो. शासनाकडून प्रवीणला अपंग सायकलदेखील देण्यात आली आहे. केवळ कुटुंबाचा डोलारा न सांभाळता अभ्यासात हुशार असणारा प्रवीण इतर खेळातही आपल्या नावाप्रमाणे प्रवीण आहे. विविध स्तरावर होणाऱ्या अपंगांच्या स्पर्धांमधून तो नेहमीच यश संपादन करता आला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या १० व्या सिनियर व चौथ्या ज्युनिअर राज्यपातळीवरील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये थाळीफेक या प्रकारात प्रथम क्रमांक तर गोळाफेक या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. रास्त धान्य दुकानात नोकरी करण्यापूर्वी प्रवीण छोटेखानी दुकान चालवत असे. मात्र, यातून मिळणारे उत्पन्न अगदीच नगण्य होते. त्यातच यादरम्यान वडिलांचे निधन झाल्याने आपल्या परिवाराची जबाबदारी प्रवीणच्या खांद्यावर पडली. प्रवीणच्या परिवारात आई, भाऊ व दोन बहिणी आहेत. यातील दोन बहिणींची लग्न झाली असून, वडिलांच्या निधनामुळे एका बहिणीच्या लग्नाची जबाबदारी प्रवीणच्या खांद्यावर आली ती त्याने यशस्वीरित्या पार पाडली. जन्मत: अपंग असल्याने ही सर्व परिस्थिती हाताळताना प्रवीणला खूप मोठी कसरत करावी लागली आहे.दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अपंगत्त्वासारख्या कठीण परिस्थितीवर मात.इयत्ता १०वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रवीणच्या कुटुंबात अन्य कोणीच कमावणारी व्यक्ती नसल्याने अपंगत्त्वातही त्याच्यावर पडले ओझे.धान्य दुकानाच्या शासकीय कामासाठी दोन्ही हातातील कुबड्या घेऊन तो तालुक्याचा प्रवास.स्पर्धांमध्ये भाग घेत नेहमीच यशस्वी होतो.