शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

संगीतकला जोपासणारे कुटुंब

By admin | Updated: November 5, 2015 00:01 IST

हार्मोनियमचा व्यवसाय : कामाबरोबरच छंद म्हणून पाहण्याचा मेस्त्री कुटुंबीयांचा दृष्टिकोन

गुरूप्रसाद मांजरेकर - मिठबाव--सर्वसाधारणपणे काम केल्याशिवाय पोट भरता येत नाही, ही भावना सर्वत्र आहे. माणसाला लाभलेले पोट अटळ असून प्रत्येकजण पोट भरण्यासाठी धडपडत असतो. शारीरिक, बौद्धिक काम करत असतो. हे सर्व करत असतानाही आपले काम चरितार्थाच्या साधनाबरोबरच छंद म्हणून जोपासणारी काही माणसे आपल्याला आजही आढळतात. देवगड तालुक्यातील मिठबाव या गावात श्री काळंबादेवी हार्मोनियम मेकर्स ही आस्थापना रमेश श्रीधर मेस्त्री हे चालवितात. चरितार्थासाठी सुतारकाम करतानाच उपजत अंगी जोपासलेली संगीत कला ही आज मेस्त्रींना रोजीरोटी देण्याबरोबरच नावलौकिकही मिळवून देत आहे.गावातील लोकांच्या घराच्या लाकूडसामानासाठी चिरकामाची गैरसोय ओळखून छोट्या प्रमाणावरील चिरकाम मशीन मेस्त्री कुटुंबाने बसवली आहे. विजेच्या गैरसोईवर मात करीत जनरेटरवर चालणारे हे मशीन वेळप्रसंगी नादुरुस्त झाल्यास त्यातील एखादा ‘पार्ट’ स्वत: बनवून दुरुस्त करण्याचे काम रमेश यांचे बंधू बाळकृष्ण (बाळा) मेस्त्री इमानेइतबारे करतात. मिठबाव दशक्रोशीतच नव्हे संपूर्ण जिल्ह्यात उच्चतम हार्मोनियम बनवणारी कंपनी म्हणून रमेश मेस्त्रींच्या काळंबादेवी हार्मोनियम मेकर्स ओळखली जाते. हार्मोनियमच्या कामाबरोबरच त्यांनी आपल्या हस्तकौशल्यातून अनेक सुबक व कोरीव मूर्तींची कामे केली आहेत. अनेक मंदिरामधील आकर्षक दरवाजांच्या चौकडीवरील कोरीव काम त्यांनी केले आहे. विविध देशी विदेशी बनावटींच्या मशीनरी व घड्याळे दुरुस्तीचीही कामे ते करतात. रमेश मेस्त्री आणि बंधू बाळकृष्ण मेस्त्री यांनी वडील श्रीधर मेस्त्री यांच्या कार्याचा वसा पुढे चालविला आहे. वडील श्रीधर मेस्त्री यांनी त्यांच्या कारकिर्दीत विविध समाजोपयोगी कामे केली आहेत. परदेशी बनावटीच्या मशीनरी दुरुस्त केल्या. त्यामध्ये फक्त संपत्ती मिळवणे हा एकमेव हेतू नव्हता. स्वत: नवनवीन कौशल्य आजमावणे, आपला छंद जोपासणे हा त्यामागचा त्यांचा उद्देश होता.वेगळेपण जपताहेत..संगीत क्षेत्रातही या मेस्त्री बंधूंनी मोठे नाव कमावले आहे. गायनाबरोबरच तबलावादन, पखवाज वादनातही हे मेस्त्री बंधू तरबेज आहेत.अनेक संगीत नाटके व दशावतारी नाटकांनाही त्यांनी संगीतसाथ दिली आहे. वडील व काका यांचे अंगचे संगीत व वाद्य वाजवणे हे गुण मुलगा रंजनही जोपासत आहे. ‘‘लव्ह वर्क ’’ हे तत्त्व जोपासणारे हे कुटुंब आजच्या व्यावसायिक जगातही आपले वेगळेपण जपत आहे.शासनदरबारी नोंदीची गरजअगदी आजच्या पिढीतही कामाला छंद म्हणून जोपासणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात किमान एक तरी कु टुंब आढळते. शासनदरबारी याची नोंद ठेवून त्याचे वेगळेपण टिकवण्यासाठी आर्थिक मदतीची तरतूद शासनाकडून केली जावी.-रमेश मेस्त्री,हार्मोनियमकार, मिठबाव