शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

चिपळूण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची फसगत

By admin | Updated: August 20, 2016 22:54 IST

कोकण रेल्वे : अप-डाऊन मार्गावरील गाड्यांचा प्लॅटफॉर्मवरील डबा क्रमांक सारखाच

अतुल कामत -- रत्नागिरी  -रत्नागिरीकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेचे डबे ज्या क्रमांकाने प्लॅटफॉर्मवर लागतात, त्याचक्रमाने मुंबईकडून रत्नागिरीकडे येणाऱ्या रेल्वेचे डबे लागतील का? अप आणि डाऊन ट्रेनच्या डब्यांच्या प्लॅटफॉर्मवरील बोगीदर्शक फलकावरील क्रमांक वेगळाच असायला हवा ना... पण चिपळूण रेल्वेस्थानकाने ही करामत करून दाखवली आहे. चिपळूण स्थानकातील दोनही प्लॅटफॉर्मवर बोगीदर्शक फलकावरील क्रमांक चुकीचे लावण्यात आले असून, त्यामुळे प्रवाशांची मोठी फसगत होत आहे.गाडी स्थानकात दाखल झाली की, आपला डबा कुठे येईल, हे सर्वसामान्य लोकांना कळते ते प्लॅटफॉर्मवर असलेल्या बोगीदर्शक फलकांवरून. स्थानकामध्ये येणाऱ्या रेल्वेत वातानुकुलीत डबा इंजिनपासून कितव्या क्रमांकाचा आहे, जनरलचा डबा कितव्या क्रमांकावर आहे, दुय्यम श्रेणीचा डबा कितव्या क्रमांकावर आहे, याची उद्घोषणा केली जाते. त्यानंतर अनेक लोक प्लॅटफॉर्मवरील बोगीदर्शक फलकावर लिहिलेल्या क्रमांकासमोर जाऊन उभे राहतात. ही सर्वसाधारण पद्धत आहे. त्यामुळे स्थानकात रेल्वे दाखल झाल्यानंतर प्रवाशांची धावपळ होत नाही.मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडीचे इंजिन सर्वात पहिले असते आणि तेथून डब्यांचे क्रमांक मोजायला सुरूवात होते. जर गाडी त्याच्या उलट दिशेने जाणार असेल तर त्याचे बोगी दर्शक फलकावरील क्रमांक उलटेच असणे आवश्यक आहे. म्हणजेच फलकाच्या एका बाजूला गाडीच्या डब्याचा १ असा क्रमांक असेल तर त्याच्या मागच्या बाजूला २४ असाच असायला हवा. चिपळूण रेल्वे स्थानकाने याच विषयात आपली करामत दाखवली आहे. फलकावर जेथे १ क्रमांक लिहिला आहे, त्याच्या मागील बाजूसही १ असाच क्रमांक टाकण्यात आला आहे.चिपळूण स्थानकात मुंबईकडे जाणारी रेल्वे थांबली असेल तर तिचा पहिला डबा जेथे येतो, त्या जागेवर गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वेचा पहिल्या क्रमांकाचा डबा येणारच नाही. त्यामुळे उद्घोषणा (अनाऊन्समेंट) ऐकून त्या-त्या क्रमांकावर उभे राहणाऱ्या प्रवाशांची गाडी आल्यानंतर धावपळ होत आहे.सदरची बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांना यात काही चूक असल्याचे वाटत नाही, असा धक्कादायक अनुभवही चिपळूण रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना येत आहे.हा घ्या पुरावा!चिपळुणातील रेल्वे स्थानकांवरील हे चित्र! अप आणि डाऊन रेल्वेच्या बाबतीत डब्यांचा क्रमांक तोच टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे. अप आणि डाऊनसाठी १३ आणि १४ क्रमांकाच्या डब्याची ही प्रातिनिधिक छायाचित्रे! कोकण रेल्वेने केलेल्या हलगर्जीपणामुळे आरक्षित आणि विनारक्षित दोन्ही प्रकारच्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.