शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट खतांचा सुळसुळाट वाढला

By admin | Updated: June 11, 2015 00:27 IST

भातशेती हंगाम : देवगडमध्ये कृषी विभागाचे दुर्लक्ष, परजिल्ह्यातील एजंट

पुरळ : देवगड तालुक्यामध्ये सेंद्रिय व रासायनिक बनावट खते सध्या विकली जात असून, याकडे कृषी विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. परजिल्ह्यातील काही एजंट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन बनावट खते विकत असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यामध्ये भातशेतीसाठी रासायनिक खतांचा सर्रास वापर केला जातो. तसेच आंबा कलमांना सेंद्रिय व रासायनिक खते वापरली जातात. काही नामांकित कंपन्यांची खते वगळता बनावट खते काही एजंट राजरोसपणे येथील शेतकऱ्यांना विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सेंद्रिय खतेही बऱ्याचशा प्रमाणात बनावट असल्याचे सांगण्यात येत आहे. गेली चार ते पाच वर्षे बनावट खते विकून एजंटांनी आपले बस्तान तालुक्यामध्ये मजबूत केले आहे. काही गावातील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून बनावट खतेही विकली जात असल्याचे बोलले जात आहे. कृषी विभागाची मान्यता नसतानाही ही खते राजरोसपणे कशी विकली जात आहेत. याकडे कृषी विभाग दुर्लक्ष का करीत आहे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.देवगड तालुक्यामध्ये शेतीसाठी रासायनिक खत सुमारे ५ हजार मेट्रिक टन वापरले जाते. तसेच आंबा कलमांनाही रासायनिक खतांचा वापर केला जातो. सेंद्रिय खतांमध्ये वाळू असल्याचे आढळून आले आहे. कृषिटेक कंपनीची खते हीच योग्य असल्याचे बोलले जात आहे. संवर्धन सेंद्रिय खत आंबा कलमांसाठी अतिशय उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, बनावट खते विकणारे एजंट आपले बनावट खत दर्जेदार असल्याचे शेतकऱ्यांना सांगून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.गतवर्षी हजारो टन बनावट खते विक्री झाल्याचे शेतकऱ्यांच्या तक्रारी असतानाच यावर्षी कृषी विभागाने यावर लगाम लावण्याच्या दृृष्टीकोनातून का प्रयत्न केले नाहीत. यामुळे देवगड तालुक्यातील कृषी विभागही बनावट खतांच्या एजंटानी काबीज केला असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रक विभागाला हप्ते मिळत असल्याने तेही हेतूपुरस्सर याकडे दुर्लक्ष करीत आहेत. (वार्ताहर)