शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांकडूनही मच्छिमारांचा विश्वासघात : परशुराम उपरकर

By admin | Updated: November 8, 2015 23:36 IST

पारंपरिक आणि पर्ससीननेट मच्छिमारांच्या वादात पालकमंत्र्यांनी लक्ष घातले नाही.

कणकवली : मच्छिमारांच्या प्रश्नाबाबत कोणी कोणाला पळवून लावले व कोणाला जवळ केले, हे मच्छिमारांना ठाऊक आहे. गेल्या पंधरा वर्षांत माजी पालकमंत्री नारायण राणे यांनी मच्छिमारांना झुलवत ठेवले. तर खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनीही मच्छिमारांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. शिवसेना-भाजपातील अंतर्गत वादात मच्छिमारांचा प्रश्न चिघळला असल्याचेही उपरकर म्हणाले. आमदार वैभव नाईक हे पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने असल्याचे सांगत आहेत. गेल्या महिन्यात समुद्रातील मच्छिमारांच्या उपोषणावेळी नाईक यांनी मत्स्योद्योगमंत्री एकनाथ खडसे यांना सिंधुदुर्गात आणणार असल्याचे सांगितले होते. हे आश्वासन फोल ठरले आहे. वर्षभर हा मच्छिमारांचा प्रश्न जवळून पाहणाऱ्या आमदार नाईक यांनी हा प्रश्न का सोडवला नाही? असा सवाल उपरकर यांनी केला.पारंपरिक आणि पर्ससीननेट मच्छिमारांच्या वादात पालकमंत्र्यांनी लक्ष घातले नाही. हिंसक आंदोलने होऊनही पालकमंत्री मच्छिमारांची भेट घेण्यासाठीही आले नाहीत. त्यांचे आणि आमदार नाईक यांचे सूर अद्याप जुळलेले नाहीत. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील वेंगुर्ल्यात बहुतांश पर्ससीननेट मच्छिमार आहेत. पालकमंत्र्यांना पालकत्वाचे महत्त्वच नाही. उपरकर म्हणाले की, आमदार नाईक यांनी मंत्र्यांना जिल्ह्यात आणण्यापेक्षा अभ्यास करून अधिवेशनात हा प्रश्न मांडावा. हा प्रश्न सर्वाेच्च आणि उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाने याप्रश्नी वकील देऊन शासनाची भूमिका मांडण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष होत आहे. आम्हाला मालवणवासीयांनी निवडून दिलेले नसतानाही आम्ही सातत्याने मच्छिमारांचा प्रश्न अभ्यासपूर्ण मांडला. मात्र, आमदार नाईक यात का कमी पडत आहेत. आम्ही या प्रश्नी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली असून प्रसंगी न्यायालयात जाऊ, असे परशुराम उपरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)