शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

भराडीदेवी यात्रोत्सव आजपासून

By admin | Updated: March 1, 2017 23:40 IST

आंगणेवाडी सज्ज : लाखो भाविकांचा जनसागर उसळणार; सीसीटीव्ही कॅमेरे, चोख पोलिस बंदोबस्त

मालवण : नवसाला पावणारी अशी ख्याती पसरलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी श्रीदेवी भराडीच्या यात्रोत्सवाला आज, गुरुवार २ मार्च रोजी पहाटेपासून सुरुवात होत आहे. यात्रेला लाखो भाविकांचा जनसागर उसळणार असून, यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, या हेतूने मंडळ तसेच प्रशासनाच्यावतीने सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. सात रांगांतून भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी दहा लाखांहून अधिक भाविक येतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.दरम्यान, यात्रोत्सवानिमित्त आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, चोख पोलिस बंदोबस्त, भव्य मंडप आणि मंदिर परिसरातील लक्षवेधक विद्युत रोषणाई व आकर्षक, मोहक अशी फुलांची आरास करून मंदिर सजविण्यात आलेआहे. महायात्रोत्सवाची शुक्रवारी मोड यात्रेने सांगता होणार आहे. श्रीदेवी भराडीचा यात्रोत्सव सुरळीत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आंगणे कुटुंबीय, ग्रामपंचायत मसुरे, महसूल, पोलिस प्रशासन व सर्वसंबंधित विभाग यांच्या सहकार्यातून तसेच नियोजनातून यात्रेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. आंगणेवाडी परिसर दुकानांच्या गर्दीने सजला आहे. (प्रतिनिधी) सुरक्षेसाठी शेकडो पोलिस तैनातदरवर्षी आंगणेवाडी यात्रोत्सवात भाविकांची संख्या वाढत असते. त्यानुसार याहीवर्षी गतवर्षीपेक्षाही मोठी गर्दी उसळेल, असा अंदाज आहे. व्हीआयपींची संख्याही वाढेल, हे गृहीत धरून जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मजा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, दंगा काबू पथक यांच्यासह जिल्ह्यातील ३०० महिला व पोलिस कर्मचारी तसेच रत्नागिरी व रायगड येथील १५० पोलिस कर्मचारी अशा ४५० कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.