शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

वेर्लेत घरकुल योजनेत बनावट कागदपत्रे !

By admin | Updated: December 19, 2014 23:31 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

सावंतवाडी : घरकुल योजनेत बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी भगवान विष्णू नाईक-जाधव आणि सीताराम महादेव कदम या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याकरिता सदाशिव सोनू कदम (रा. वेर्ले-कदमवाडी) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी पत्र सादर केले आहे. सन २००७ मध्ये सीताराम महादेव कदम (वय ४५) याने सावंतवाडी पंचायत समिती येथे घरकुल योजनेखाली प्रस्ताव सादर केला होता. यासाठी विष्णू धोंडी नाईक (वय ८०) यांचे कुळ लागलेल्या देवस्थानच्या जमिनीचा लाभ घरकुलासाठी घेण्यात आला होता. यावेळी भगवान नाईक-जाधव याने विष्णू नाईक यांच्या नावाचा वापर करून प्रस्तावात त्यांचे वय ४० असल्याचे नमूद करून व आपला फोटो वापरून आपणच विष्णू नाईक असल्याचे भासवून संमतीपत्रावर स्वाक्षरी करून शासनाची फसवणूक केली होती. या प्रकरणात घरकुल लाभधारक सीताराम महादेव कदम यांच्यासाठी पुंडलिक तुकाराम कदम यांनी संबंधितांची ओळख असल्याची साक्ष नोंदविली आहे. या संपूर्ण प्रकरणात सीताराम महादेव कदम, भगवान विष्णू नाईक-जाधव, पुंडलिक तुकाराम कदम यांनी शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे. या पत्राची प्रत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर आदींना दिली आहे. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे असून या एका प्रकरणात जरी कारवाई झाली तरी इतर प्रकरणांना चाप बसेल, अशी आशा सदाशिव कदम यांनी या निवेदनातून व्यक्त केली आहे. (वार्ताहर)यातील सीताराम महादेव कदम हे मृत असून अन्य दोघांवर शासकीय संमतीपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. जेणेकरून शासनाच्या झालेल्या फसवणुकीला चाप लागेल, अशी मागणी सदाशिव कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.