शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस, गडकरी आज रत्नागिरीत

By admin | Updated: January 29, 2016 00:37 IST

चौपदरीकरणाच्या भूमिपूजनामुळे कोकणवासीयांचे गेल्या दोन दशकांपासूनचे स्वप्न साकारण्यास सुरुवात

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या निवळी (रत्नागिरी) येथे होणाऱ्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजनासह अन्य कार्यक्रमांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज, शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. चौपदरीकरणाच्या भूमिपूजनामुळे कोकणवासीयांचे गेल्या दोन दशकांपासूनचे स्वप्न साकारण्यास सुरुवात होणार आहे. गडकरी व फडणवीस यांच्या उपस्थितीत निवळी येथे आज सकाळी १० वाजता महामार्ग चौपदरीकरणाचे भूमिपूजन होणार आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप व मित्रपक्षांचे सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्री नितीन गडकरी यांनी चौपदरीकरणाच्या विषयाला गती दिली होती. त्यानुसार तत्परतेने चौपदरीकरणाबाबतचे अनेक निर्णय घेतले. त्यासाठी ६ हजार कोटींच्या निधीचीही तरतूद केली. आता त्यांच्याच हस्ते निवळी येथील रिलायन्स पेट्रोलपंपासमोर महामार्गावर या चौपदरीकरणाचे भूमिपूजन होत आहे. राज्यासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याने यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजनानंतर दुपारी १.३0 वाजता मंत्री गडकरी यांच्या हस्ते रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन होणार आहे. त्यांच्याच हस्ते या इमारतीचे भूमिपूजन २०१४ मध्ये झाले होते. त्यानंतर २.३० वाजता ते रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)