शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

स्कुबा डायव्हींगमधून देवगडचा चेहरा बदलणार

By admin | Updated: December 21, 2015 00:30 IST

नीतेश राणे : मिठमुंबरी येथील भूमिपूजन सोहळ्यात प्रतिपादन

कुणकेश्वर : देवगडवासीयांच्या विरोधात जाऊन कुठलाही प्रकल्प देवगडमध्ये साकारणार नाही. मिठमुंबरी येथे स्कुबा डायव्हींग सेंटर साकार करून देवगडचा चेहरा बदलण्याचे पहिले पाऊल टाकले आहे. सी वर्ल्ड प्रकल्पाचा विषयच मुळात या सेनाभाजप सरकारला समजला नसल्यामुळे सी वर्ल्डचा आता फिश टँक झाला असल्याचे मत आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केले.मिठमुंबरी येथे देवगड मरिन अ‍ॅडव्हेंचर स्कुबा डायव्हींग सेंटरच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सतिश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, शिक्षण सभापती गुरूनाथ पेडणेकर, बालकल्याण सभापती अंकुश जाधव, सभापती मनोज सारंग, तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, बाळा खडपे, प्र्रणाली माने, मिठमुंबरी सरपंच बाळकृष्ण गावकर, अमर गावकर, वैभव दांडेकर, सुधीर जोशी, चारूदत्त सोमन आदी उपस्थित होते. राणे म्हणाले, स्कूबा डायव्हींग सेंटर निर्माण करून मिठमुंबरी किनारपट्टीवर अनेक रोजगाराच्या संधी स्थानिक तरूणांना उपलब्ध होणार आहेत. मालवणसारख्या ठिकाणी पर्यटकांना विविध मनोरंजनाची ठिकाणे असल्यामुळे तेथे पर्यटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तोच दृष्टीकोन लक्षात ठेवून देवगडमध्ये असे पर्यटन सेंटर आणून देवगडचा कायापालट करण्याचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवला होता. मात्र, पर्यटन वाढीसाठी लागणाऱ्या जोडधंद्याचा अभ्यास करण्यासाठी आतापासून नागरिकांनी कामाला लागले पाहिजे. मिठमुंबरी येथे साकारत असलेले स्कूबा डायव्हींग सेंटर हे पारदर्शकपणे लोकांसमोर सांगितले तर हा प्रकल्प साकारताना कुठलीही अडचण आम्हाला निर्माण होणार नाही.देवगडवासीयांसाठी सर्व काही मीच करणार असे नाही. कुठल्याही चांगल्या कामाचे पहिले पाऊल मी टाकले असले तरी पुढील पाच पावले देवगडवासीयांनी टाकायची आहेत. यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ सिंंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून मिळत असेल तर तुमची जिद्द, चिकाटी दाखवून तूम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकता. तसेच महिला बचतगटांनी देखील एक पाऊल पुढे जाऊन आता न्याहारी निवास योजनेमध्ये पर्यटकांना आकर्षित करून आपला व्यवसाय वाढविण्यासाठी आतापासून पुढाकार घेणे गरजेचे आहे. सावंत म्हणाले की, सिंंधुदुर्ग जिल्हा १९९८ साली पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करून माजी पालकमंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्यामध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याचे काम केले आहे. स्कुबा डायव्हींग सेंटरमध्ये जमीन मालकांनाच भागीदार करून जिल्ह्यामध्ये नवीन इतिहास आमदार राणे यांनी निर्माण केला आहे. मालवणमध्ये विकासाला विरोध केला जातो, मात्र देवगडमध्ये विकासाला साथ दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मिठमुंबरी येथे स्कुबा डायव्हींग सेंटरसाठी अमर गावकर यांनी जागा दिली. सरपंच बाळकृष्ण गावकर, चारूदत्त सोमण, सुधीर जोशी यांनी विचार मांडले तर वैभव दांडेकर यांनी मिठमुंबरी येथे साकारत असलेल्या स्कूबा डायव्हींग सेंटरविषयी माहिती दिली. प्रास्ताविक पंकज सावर्डेकर यांनी, सूत्रसंचालन मिलिंंद कुलकर्णी व आभार प्रकाश राणे यांनी मानले. (वार्ताहर)