शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांना मुदतवाढ; उपनगराध्यक्ष निवडी

By admin | Updated: June 11, 2014 00:36 IST

वेंगुर्लेत वेंगुर्लेकर; सावंतवाडीत पोकळे उपनगराध्यक्ष

सिंधुदुर्गनगरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, सावंतवाडी व वेंगुर्ले या तिन्ही नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांना सहा महिने मुदतवाढ देण्याचा अधिकृत निर्णय राज्यपालांच्या स्वाक्षरीने आज, मंगळवारी दुपारी १२ वाजता आला असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे या तिन्ही नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांना डिसेंबर २०१४ पर्यंत पदावर राहण्यास संधी मिळाली आहे, तर उपनगराध्यक्ष पदासाठी वेंगुर्लेत झालेल्या निवडीत मनसेचे अभी वेंगुर्लेकर आणि सावंतवाडीत राष्ट्रवादीचे राजन पोकळे यांची बिनविरोध निवड झाली.विधानसभेची निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी, पोलीस यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नगराध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा, असे विधेयक मांडण्यात आले होते व ते मंजूरही करण्यात आले.विधानसभेच्या निवडणुका आॅक्टोबरमध्ये असल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाने नगराध्यक्षांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सावंतवाडी, वेंगुर्ले व मालवण या तिन्ही नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाचा कालावधी जून २०१४ मध्ये पूर्ण होत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या नगराध्यक्षपद निवडीच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे मालवणचे नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, वेंगुर्लेच्या नगराध्यक्षा पूजा कर्पे यांच्या कार्यकालात वाढ झाली आहे.अभी वेंगुर्लेकर यांना लॉटरीवेंगुर्ले उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होऊन मनसेचे निलंबित नगरसेवक अभी वेंगुर्लेकर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यामुळे वेंगुर्ले पालिकेत सतरा पैकी बारा सदस्य असतानादेखील मनसेचे नगरसेवक अभी वेंगुर्लेकर यांना उपनगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी वेंगुर्लेकर हे आपलेच असल्याचे जाहीर केले आहे. राजन पोकळे बिनविरोधसावंतवाडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड पार पडली. यात राजन पोकळे यांची निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर व अन्य नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले.पुढील नगराध्यक्षांना दोनच वर्षांचा कालावधीसावंतवाडी, वेंगुर्ला व मालवण या नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांची मुदत अडीच वर्षांची आहे. या नगराध्यक्षपदाचा कालावधी हा जूनमध्ये संपत होता. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही नगरपरिषदांच्या निवडणुकीत सहा महिने वाढ झाल्याने त्यांना आता डिसेंबरपर्यंत पदावर राहता येणार आहे. त्यामुळे पुढील नगराध्यक्षांना मात्र दोनच वर्षांचा कालावधी मिळणार आहे. (प्रतिनिधी)