शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

परिचालकांनी सावधानता बाळगावी

By admin | Updated: April 10, 2015 00:24 IST

वाद संगणक परिचालकांचा : लक्ष्मण गवस यांनी केले आवाहन

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही नव्याने डाटा आॅपरेटर परिचालकांची संग्राम कक्षाच्यावतीने राम पाटील यांनी भरती केली व नव्याने आम्ही काम करण्यास तयार असल्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे व जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांना काही दिवसांपूर्वी दिले होते. मात्र, नवीन संगणक परिचालकांची पिळवणूक होऊ नये व पगार थकू नये म्हणून सावधानता बाळगावी, असे बुधवारी दिलेल्या परिपत्रकात जिल्हा संगणक परिचालक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण गवस यांनी म्हटले आहे.लक्ष्मण गवस यांनी या परिपत्रकात म्हटले आहे की, महाआॅनलाईन कॉन्ट्रॅक्टर म्हणून पुन्हा मान्यता मिळावी, यासाठी राम पाटील यांनी खटाटोप चालू केला आहे. ते जिल्ह्याचे समन्वयक असताना आम्ही काम करीत असताना जर संगणक परिचालकांचा पगार वेळेवर मिळाला असता तर आम्ही आंदोलने, उपोषणे करण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र, या संग्राम कक्षात शासन निर्णयानुसार ८४०० रुपये मिळत असताना आम्हाला फक्त ४१०० रुपये मानधनावर काम करावे लागत होते. मात्र, आज आम्ही सर्व परिचालकांनी वर्षभर या ८४०० रुपये मानधनासाठी पुढाकार घेतला तेव्हा ते कोठे गेले होते. त्यावेळी आमच्या परिचालक बांधवांचा पगार तुटपुंजा देऊन त्यावरील मलई मात्र खात बसले होते. आम्ही याकरिताच उपोषणे व आंदोलने केली व न्यायहक्कांसाठी आजपर्यंत लढत आहोत. संगणक परिचालकांना मिळणारा गणवेश, ओळखपत्र, तालुका व जिल्हास्तरावरील मिटिंग व ट्रेनिंग भत्ता, तसेच येण्या-जाण्याचा खर्च अद्याप दिलेला नाही.जर उद्याच्या कोणत्याही महाआॅनलाईन कंपनीने टेंडर भरले (किंवा मिळाले) तरी हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारू. आमचा लढा शोषणासाठी व शोषकाविरुद्ध आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे टार्गेट देतात व इतर कामे करून घेतात. (उदा. पंचायत समिती स्तरावर अद्ययावत असलेल्या जन्म- मृत्यू नोंदी, निर्मल भारत अभियान, एमआरईजीएस पातळीवरून येणाऱ्या ग्रामपंचायत तपासणीचे अहवाल) ती पूर्ण करण्यासाठी सर्व रजा रद्द करण्याची पत्रे पाठविली गेली. मात्र, या शोषणाविरुद्ध कानावर हात ठेवतात, हेही अनाकलनीय आहे. मात्र, डाटा आॅपरेटर्सशी काहीच संबंध नाही तर जिल्हा समन्वयक राम पाटील त्यांना निवेदने का देतात? हेही मोठे कोडेच आहे व काम करण्यास ते तयार होतात. संग्राम कक्ष चालूच राहणार आहेत. तेथील लूट थांबवावी. यासाठी आमचा लढा सुरू राहील व नवीन परिचालकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन गवस यांनी केले आहे. (वार्ताहर)