शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक मच्छिमारापर्यंत पॅकेजचा लाभ देणार, मत्स्यमंत्री अस्लम शेख यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 15:04 IST

मासेमारी हंगामात आलेल्या क्यार व महा चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या मच्छीमारांना राज्य सरकारने ६५ कोटी १७ लाखांचे पॅकेज जाहीर करून आपली मागणी मान्य केली. याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी मत्स्योद्योगमंत्री अस्लम शेख यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

ठळक मुद्दे प्रत्येक मच्छिमारापर्यंत पॅकेजचा लाभ देणार, मत्स्यमंत्री अस्लम शेख यांची ग्वाहीवैभव नाईक यांनी घेतली मंत्रालयात भेट

मालवण : मासेमारी हंगामात आलेल्या क्यार व महा चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या मच्छीमारांना राज्य सरकारने ६५ कोटी १७ लाखांचे पॅकेज जाहीर करून आपली मागणी मान्य केली. याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी मत्स्योद्योगमंत्री अस्लम शेख यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन त्यांचे आभार मानले.दरम्यान, सिंधुदुर्गात या पॅकेजची अंमलबजावणी करण्याची मागणी आमदार नाईक यांनी केली. त्यावर शेख यांनी सिंधुदुर्गातील शेवटच्या मच्छिमारापर्यंत पॅकेजचा लाभ देणार असल्याची ग्वाही देत तशी कार्यवाही करण्याचे निर्देश मत्स्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.ऐन मासेमारी हंगामात आलेल्या क्यार व महाचक्रीवादळाच्या तडाख्यात सिंधुदुर्गमधील मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले होते. राज्य सरकारने याची दखल घेऊन मच्छीमारांसाठी ६५ कोटी १७ लाखांचे पॅकेज जाहीर केले आहे. आमदार वैभव नाईक यांनी ही मागणी लावून धरत पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांनी ही मागणी मान्य केली. त्याबद्दल आम. नाईक यांनी शेख यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.प्रधानमंत्री मत्स्य संपदासाठी बैठक घ्याकेंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये योग्य अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणे आवश्यक असून ही बैठक आयोजित करण्याची मागणी आमदार नाईक यांनी शेख यांच्याकडे केली. त्याबाबतही शेख यांनी नियोजनासाठी बैठक आयोजित करून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा फायदा देखील महाराष्ट्रात जास्तीत जास्त करून देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFishermanमच्छीमारVaibhav Naikवैभव नाईक Shiv Senaशिवसेनाministerमंत्री