शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

विकास आघाडीचा ‘स्वाभिमान’मध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:21 IST

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणूक स्वतंत्रपणे लढविलेल्या कणकवली विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. यावेळी स्वाभिमानचे संस्थापक खासदार नारायण राणे उपस्थित होते.कणकवली नगरपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कणकवली विकास आघाडीने स्वतंत्र पॅनेल केले होते. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विरोधात या आघाडीने निवडणूक लढविली होती. थेट नगराध्यक्ष पदासाठी राकेश ...

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणूक स्वतंत्रपणे लढविलेल्या कणकवली विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. यावेळी स्वाभिमानचे संस्थापक खासदार नारायण राणे उपस्थित होते.कणकवली नगरपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कणकवली विकास आघाडीने स्वतंत्र पॅनेल केले होते. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विरोधात या आघाडीने निवडणूक लढविली होती. थेट नगराध्यक्ष पदासाठी राकेश राणे यांनी या आघाडीच्यावतीने निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांना ११०० मते मिळालीहोती. नगराध्यक्ष पदासह आठ नगरसेवक या कणकवली विकास आघाडीने निवडणुकीत उभे केले होते.आमदार नीतेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर रविवारी कणकवली विकास आघाडी स्वाभिमान पक्षात विसर्जित करण्यात आली.खासदार नारायण राणे यांच्या ओम गणेश या निवासस्थानी कणकवली विकास आघाडीच्या पदाधिकाºयांनी कार्यकर्त्यांसह स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. यावेळी स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, नूतन नगराध्यक्ष समीर नलावडे उपस्थित होते. कणकवली विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राकेश राणे यांच्यासह मनोहर राणे, अंबाजी राणे, संजना सदडेकर, सखाराम राणे, श्रीकृष्ण राणे, मोमीन शेख, श्रीकृष्ण निकम, संतोष पिळणकर, मंगेश घाडीगांवकर, उमेश बुचडे, मंदार सावंत, अक्षय घाडीगांवकर, विजय राणे, सत्यवान राणे, अनंत राणे, गुरुदास राणे आदी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दरम्यान, कणकवली विकास आघाडी ही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात विसर्जित झाल्यामुळे कणकवली शहरातील राजकारणात बदल होणार आहे.