शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोनचे अतिक्रमण

By admin | Updated: June 15, 2014 00:30 IST

सायबर कॅफेंना कुलूप : महसूल करामुळे मालक अडचणीत

प्रसन्न राणे ल्ल सावंतवाडीसिंधुदुर्ग जिल्ह्यात स्मार्टफोनचे अतिक्रमण वाढल्याने ५० टक्के सायबर कॅफेंना कुलूप लागले आहेत. कॅफे बंद असूनही शासनाचा महसूल कर भरावा लागत आहे. मात्र, आता या करातही वाढ होणार असल्याने सायबर कॅफेचे मालक अडचणीत येणार आहेत. सध्या सायबरच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे कॅफेत येणाऱ्या ग्राहकांकडून ओळखपत्र आणि त्याचा पत्ता सक्तीने घ्यावा लागत आहे. याचे सावंतवाडीत प्रमाण नगण्य असले तरी स्मार्ट फोनच्या सर्रास वापरामुळे सायबर कॅॅफेंना फटका बसत आहे. एकूण गुंतवणुकीच्या तुलनेत उत्पन्न मिळत नसल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५० टक्के कॅफे बंद झाले असून भविष्यात सायबर कॅफे सुरू राहतील का? याबाबत शंका निर्माण झाली आहे. जगातील बहुतेक व्यवहार आता इंटरनेटच्या माध्यमातूनच होत असल्याने जग जवळ आले आहे. पूर्वी इंटरनेट कॅफेंची संख्या मर्यादितच होती. मात्र, स्मार्टफोनच्या वापरामुळे इंटरनेट आता तरुणाईसह सर्वांच्याच मुठीत आले आहे. कमीत कमी दरात वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्टफोन मिळत असल्याने आता सामान्य जनतेमध्येही स्मार्टफोनचे फॅड पसरू लागले आहे. यासाठी लागणारे रिचार्जही सुलभरित्या उपलब्ध होत असल्याने तरुणाई तर चोवीस तास इंटरनेटमध्ये गुंतल्याचे दिसून येत आहे. यामुळे सायबर कॅफेकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. तसेच घरोघरी संगणक, लॅपटॉप आल्याने आता सायबर कॅफेमध्ये जाण्याची गरजही तशी उरलेली नाही. काही वर्षांपूर्वी सायबर कॅफेसाठी ग्राहकांची गर्दी व्हायची. आता मात्र हे कॅफे बकाल होत चालले आहेत. घरातच इंटरनेटवर काम करून केवळ प्रिंट मारण्यापुरता सायबर कॅफेचा मर्यादित वापर होऊ लागला आहे. इंटरनेटसह रिचार्ज, झेरॉक्स, टीव्ही रिचार्ज आदी सुविधा उपलब्ध असलेले काही कॅफे तग धरून असल्याचे दिसून येत आहे. सायबर कॅफे सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयीन करमणूक शाखेची परवानगी घ्यावी लागते. त्याबरोबरच जागेचे भाडे सुमारे ५ हजार रुपये, एक संगणक २५ हजार रुपये (असे किमान पाच संगणक), तसेच कॅफेची सजावट आदीसाठी सुमारे दीड लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. शिवाय प्रिंटर, स्कॅनर, लाईट बिल, सर्व्हिसिंग आदींचा खर्च वेगळाच. एवढे सर्व करूनही सर्फिंगचा दर मात्र तासाला केवळ २० रुपये मिळत असल्याने सायबर कॅफे चालविणे कठीण होऊन बसले आहे. तर काही ठिकाणी याचा वापर केवळ व्हिडीओ गेम्ससाठी केला जात आहे. परंतु आता संगणक, लॅपटॉप आणि स्मार्ट फोनवरही विविध प्रकारचे गेम्स उपलब्ध असल्याने मुलांनी सायबर कॅफेकडे पाठ फिरविलेली दिसत आहे.