शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय भूखंडात अतिक्रमण

By admin | Updated: July 16, 2014 23:17 IST

सुनील मोरजकर : वेंगुर्ले पंचायत समिती बैठकीत गौप्यस्फोट

वेंगुर्ले : वेंगुर्ले कॅम्प येथे वेंगुर्ले पंचायत समिती कार्यालयीन इमारतीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडात अतिक्रमण झाल्याचा वेंगुर्ले पंचायत समितीचे उपसभापती सुनील मोरजकर यांनी बुधवारी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक बैठकीत गौप्यस्फोट केला. त्यास गटविकास अधिकारी टी. बी. जाधव यांनी दुजोरा दिला.वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी पंचायत समितीच्या बॅ. नाथ पै सभागृहात सभापती अभिषेक चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती सुनील मोरजकर, गटविकास अधिकारी टी. बी. जाधव, पंचायत समिती सदस्य पुरुषोत्तम परब, सावरी गावडे, चित्रा कनयाळकर, सुचिता वजराठकर, उमा मठकर, प्रणाली बंगे व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला राष्ट्रीय स्तरावरील राजीव गांधी सशक्तीकरण पुरस्कारप्राप्त परुळे बाजार ग्रामपंचायतीचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप प्रभू यांचा सभापती चमणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच पुरुषोत्तम प्रभू उपस्थित होते. हा पुरस्कार सर्व कर्मचारीवर्ग, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे मिळाला असल्याचे मनोगत प्रदीप प्रभू यांनी व्यक्त केले.वेंगुर्ले पंचायत समितीच्या कार्यालयासाठी कॅम्प येथे ४० गुंठे भूखंड आरक्षित आहे. या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे उपसभापती मोरजकर यांनी सांगताच त्यास गटविकास अधिकारी टी. बी. जाधव यांनी दुजोरा दिला. या भूखंडासभोवती दगडी कंपाऊंड घालण्यात यावे व अतिक्रमण हटविण्यात यावे असे या बैठकीत ठरले. पंचायत समितीची वेबसाईट तयार करावी व त्यासाठी पंचायत समिती सेस फंडातून खर्च करावा तसेच तालुक्यातील प्राथमिक शाळांमधील सातवीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन वर्ग सुरु करावा अशी सूचना सभापती चमणकर यांनी मांडली. तालुक्यातील रिक्त शिक्षकपदे त्वरीत भरण्यात यावीत अशी मागणी सुचिता वजराठकर यांनी केली तर रेडी प्राथमिक आरोग्यकेंद्रात डॉक्टरांची नेमणूक लवकरात लवकर करावी, अशी मागणी चित्रा कनयाळकर यांनी केली. (प्रतिनिध