शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या वीज समस्यांसाठी कर्मचाऱ्यांची गरज

By admin | Updated: June 28, 2016 00:33 IST

बांदा परिसरातील स्थिती : शहर मर्यादेच्या तुलनेत कर्मचारी कमी; २४ तास सेवा देऊनही अधिकाऱ्यांचे प्रयत्न ठरताहेत निष्फळ

नीलेश मोरजकर --बांदा शहर व परिसरात गेल्या महिनाभरात वीज अचानक गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे येथील वीज ग्राहक हे त्रस्त झाले आहेत. वीज वितरण कंपनीच्या बांदा विभागातील २३ गावांमध्ये तब्बल २१ हजार ५00 वीज जोडण्या आहेत. येथील विजेच्या समस्या या वाढत्याच असून, त्या तुलनेत कर्मचारी संख्या कमी असल्याने या समस्यांचे तातडीने निराकरण करणे हे अशक्यप्राय होते. परिणामी ग्राहकांचा नाराजीला बांद्यातील अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते. बांदा हे ग्रामीण भागात येत असल्याने येथे काम करण्यासाठी मर्यादा येत आहेत. अशा स्थितीतही येथे नव्यानेच आलेले अधिकारी हे २४ तास सेवा बजावून येथील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, येथील भौगोलिक परिस्थिती, जंगल भागातून गेलेल्या लाईन या काम करण्यासाठी अडचणीच्या ठरत आहेत.बांदा शहर व परिसरातील गावांमध्ये विजेच्या समस्या या गंभीर असून, याबाबत ग्राहकांचा मोठा रोष आहे. यामुळे गेल्या काही कालावधीत वीज ग्राहकांकडून येथील अधिकाऱ्यांना घेराव घालण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. अपुरा कर्मचारी वर्ग, जीर्ण झालेल्या वीज वाहक तारा, विद्युत खांब यामुळे विजेच्या समस्या या वाढत्याच आहेत.वीज वितरण कंपनीच्या बांदा विभागीय कार्यालयात दोन विभाग आहेत. बांदा १ मध्ये बांदा शहर, डेगवे, वाफोली, नेतर्डे, विलवडे, भालावल, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल, शेर्ले ही गावे येतात. या विभागासाठी सहायक अभियंता म्हणून सुभाष आपटेकर कार्यरत आहेत. बांदा २ मध्ये असनिये, आरोस, तांबोळी, कोनशी, नांगरतास, सरमळे, दाभिल, कास, निगुडे, पाडलोस, मडुरा, इन्सुली, रोणापाल ही गावे येतात. या विभागासाठी कनिष्ठ अभियंता पी. के. आखाडे हे कार्यरत आहेत. या दोन्ही विभागातील गावांमध्ये तब्बल २१ हजार ५00 घरगुती, व्यावसायिक वीज जोडण्या आहेत.दोन्ही विभागांतील २३ गावांसाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने काम करताना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. बांदा एकमध्ये नेतर्डे, गाळेल, डिंगणे, डोंगरपाल या गावांसाठी, तर बांदा २ मध्ये मडुरा, रोणापाल, दाभिल, सरमळे, कोनशी, तांबोळी या गावांसाठी एकही कर्मचारी नसल्याने येथील वीज ग्राहक हे वाऱ्यावरच आहेत. बांदा २ साठी मुख्य तंत्रज्ञच नसल्याने त्यांना बांदा १ वर अवलंबून रहावे लागते. बांदा शहरामध्ये ६000 वीज जोडण्या आहेत, तर या विभागातील ९ गावांमध्ये सुमारे १५ हजार वीज जोडण्या आहेत. बांदा येथे तक्रारींची संख्याही अधिक आहे. बांदा शहरासह विभागात केवळ १ लाईनमन, १ विद्युत सहायक व २ तंत्रज्ञ आहेत. २१ हजार वीज जोडण्यांसाठी हा अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने या कर्मचाऱ्यांना विजेच्या समस्या सोडविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. बांदा शहरात २२५ स्ट्रिटलाईट असून, या दिव्यांची देखभाल दुरुस्तीदेखील करावी लागते.निवेदन देऊनही ‘जैसे थे’ स्थितीबांदा शहरात २५ ट्रान्स्फॉर्मर (वीज जनित्र), तर बांदा विभागात ६0 जनित्रे आहेत. बांदा २ मध्ये ४३ जनित्रे आहेत. या जनित्रांचीदेखील देखभाल व दुरुस्तीची कामे वारंवार करावी लागतात. बांदा येथील नागरीकरणात वाढ होत आहेत. परिणामी वीज ग्राहक झपाट्याने वाढत आहेत. येथील समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, रात्रीच्या वेळीदेखील वीज गायब होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यासाठी बांद्यात रात्रपाळीसाठी २ कर्मचारी द्यावेत असे पत्र सहाय्यक अभियंता आपटेकर यांनी ३0 मे रोजी कार्यकारी अभियंत्यांना दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत कर्मचारी देण्यात आले नाहीत.