शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कणकवली तालुक्यात अकरा बोगस डॉक्टर

By admin | Updated: June 14, 2017 22:53 IST

कणकवली तालुक्यात अकरा बोगस डॉक्टर

लोकमत न्यूज नेटवर्ककणकवली : तालुक्यातील हुंबरठ तिठा येथील धन्वंतरी क्लिनिकचे सुरेश गणपती शिंदे व पियाळी येथील मूळव्याध दवाखान्याचे गोपाळ गुरूप्रसाद राय या दोन बोगस डॉक्टरांविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासणी पथकाला आणखी नऊ डॉक्टर दोषी आढळले असून, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीधर जाधव यांनी दिली.महाराष्ट्र शासनाने १३ मार्च २0१७ ला परिपत्रक काढून बोगसडॉक्टरांविरोधात धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी उदय चौधरी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शरद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील रुग्णालयांची तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. या बोगस डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी एक तपासणी पथक नियुक्त करण्यात आले होते. कणकवली तालुक्यातील हुंबरट तिठा येथील धन्वंतरी क्लिनिकचे सुरेश शिंदे व पियाळी येथील मूळव्याध दवाखान्याचे गोपाळ राय यांच्या दवाखान्यांची पथकाने ४ एप्रिल व ५ एप्रिल २0१७ रोजी तपासणी केली. या तपासणीत सुरेश शिंदे व गोपाळ राय यांच्याकडे बोगस सर्टिफिकेट आढळून आली. आपण डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांकडून पैसे उकळत असल्याचे तपासणी पथकाला आढळले. याबाबत येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीधर जाधव यांनी कणकवली पोलिसात माहिती दिली. कणकवली तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याची चर्चा सुरू होती. या बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणीही रुग्णांनी केली होती. हे बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीविताशी खेळत असल्याच्या तक्रारी तपासणी पथकाकडे प्राप्त झाल्या होत्या. कणकवलीत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली तपासणी पथकाची नेमणूक करण्यात आली होती. या पथकाने तालुक्यातील १२0 दवाखान्यांची तपासणी केली. त्यात ९ जण दोषी आढळले. यापैकी गंभीर तक्रारी असलेल्या सुरेश शिंदे व गोपाळ राय यांच्याविरोधात पोलिसात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.या प्रकरणी मेडिकल अ‍ॅक्टनुसार सुरेश शिंदे व गोपाळ राय यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर. ए. पवार करीत आहेत.