शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वेत्येत हत्तींकडून नुकसान

By admin | Updated: August 11, 2014 22:01 IST

मोर्चा सावंतवाडीकडे : माड, केळी, भातशेतीची नासधूस

सावंतवाडी : कुडाळ, दोडामार्ग तालुक्यात भातशेती व माड बागायतींचे लाखोंचे नुकसान केल्यानंतर हत्तींनी आता सावंतवाडी तालुक्याकडे रोख वळविला आहे. वेत्ये-नमसवाडी येथे रविवारी मध्यरात्री हत्तींच्या कळपाने माड, केळी बागायतींसह भातशेतीत धुडगूस घातला. यामध्ये वेत्ये येथील अण्णा तांबोसकर यांचे सुमारे एक लाख व रवींद्र गावडे यांचे पन्नास हजार रुपये असे एकूण दीड लाखाचे नुकसान झाले आहे. मडुरा-शेर्ले येथून आलेल्या हत्तींंच्या कळपाने रविवारी १२ वाजण्याच्या सुरुवातीस वेत्ये-नमसवाडी परिसरात प्रवेश करत माड, केळी बागायतींसह भातशेती व ऊसाच्या शेतीचीही नासधूस केली. तेथील अण्णा तांबोसकर यांच्या सुमारे १५ गुंठे भातशेतीसह ऊस आणि २१ माडांचे नुकसान केले. तर रवींद्र गावडे यांच्या सुमारे २० गुंठे भातशेतीचे नुकसान करत १० माड आणि ५० केळी जमीनदोस्त केल्या. सोमवारी सायंकाळी उशिरा पंचनामा करण्यात आला. तांबोसकर यांची शेतीबागायती शहरालगतच असल्याने हत्ती शहरातही घुसण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच येथील शेतकऱ्यांच्या घरांलगतच शेती व बागायती असल्याने या हत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रविवारी रात्री हत्तींनी घातलेल्या धुडगुसामुळे वेत्येसह मळगाव, सोनुर्ली भागातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सोनुर्ली भागात गेले कित्येक दिवस हत्तींचा वावर असून हातातोंडाशी आलेली शेती हिरावली जात आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतरही वनविभागाने याबाबत कोणतीही उपाययोजना न केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. मागील आठवड्यात हत्तींनी शेर्ले येथील मुकुंद शेर्लेकर यांच्या घरातच घुसण्याचा प्रयत्न केल्याने या ग्रामस्थांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दरम्यान, मडुरे-शेर्ले भागातून आलेल्या दोन ते तीन हत्तींचा हा कळप न्हावेली-निरवडे गावाच्या दिशेने गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. (वार्ताहर)शेतकरी चिंतातूरसोनुर्ली गावानंतर आता वेत्ये परिसरातही हत्तींनी नुकसान केल्यामुळे सावंतवाडी तालुक्यात हत्तींचा वावर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हत्तींचा बंदोबस्त टाळण्यासाठी वनविभाग आता कोणते पाऊल उचलतो, याकडे शेतकरीवर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.